हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर रेमोचं घरी करण्यात आलं जोरदार स्वागत, बघा व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 11:29 AM2020-12-19T11:29:58+5:302020-12-19T11:31:58+5:30

रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्वत: सांगितलं की, आता तो बरा झाला आहे. त्याने त्याच्या फॅन्सचेही आभार मानले आहेत.

Remo Dsouza discharge from hospital viral video family welcoming | हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर रेमोचं घरी करण्यात आलं जोरदार स्वागत, बघा व्हिडीओ....

हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर रेमोचं घरी करण्यात आलं जोरदार स्वागत, बघा व्हिडीओ....

googlenewsNext

कोरिओग्राफर रेमो डिसुजाला मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. हार्ट अटॅक आल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता सांगितलं जात आहे की, कोरिओग्राफरची तब्येत आता आधीपेक्षा बरीच चांगली आहे. 

रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत स्वत: सांगितलं की, आता तो बरा झाला आहे. त्याने त्याच्या फॅन्सचेही आभार मानले आहेत. नेहमीप्रमाणे त्याने हा संदेश फॅन्सपर्यंत पोहोचवला आहे. सोशल मीडियावर रेमोने मोशन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर रेमोचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. 

या व्हिडीओत बॅकग्राउंडला गणपती बाप्पाचं गाणंही सुरू आहे आणि रेमो डान्स करून हे सांगतो आहे की, तो आता ठिक आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, सर्वांना प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मनापासून धन्यवाद. माझ्या शेकडो मित्रांचेही आभार.

सोशल मीडियावर रेमोचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेमोला डिस्चार्ज मिळाल्याने त्याच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता तो अनेकजण तो लवकर कामावर परत यावा याची अपेक्षा करत आहेत. रेमो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होता तेव्हा धर्मेश, पुनीत, नोरा फतेही सोबतच अनेक डान्सर, कलाकार त्याला भेटायला आले होते. धर्मेशनने तर स्वत: समोर येऊन रेमोच्या हेल्थचे अपडेट दिले आहेत.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत रेमो थोडा कमजोर दिसत आहे. त्यामुळे तो लगेच कामावर परतणार नाही. तो काही दिवस आराम करेल त्यानंतच कामावर येईल असं चित्र आहे.
 

Web Title: Remo Dsouza discharge from hospital viral video family welcoming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.