रेमो डिसुझाला रणवीर सिंगसाठी भविष्यात करायचीय 'ही' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 06:00 AM2018-12-17T06:00:00+5:302018-12-17T06:00:00+5:30
अभिनेता रणवीर सिंग डान्स+ ४ च्या मंचावर आपला आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार सारा अली खानसोबत आला होता.
अभिनेता रणवीर सिंग डान्स+ ४ च्या मंचावर आपला आगामी चित्रपट सिम्बाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार सारा अली खानसोबत आला होता आणि आपल्या हटके अंदाजात त्याने सर्वांचे मनोरंजन केले. त्याच्या डान्सिंग कौशल्य आणि एक परफॉर्मन्स पाहून रेमो डिसुझा प्रभावित झाला. रेमोने रणवीरची पत्नी दीपिकासाठी बाजीराव मस्तानीमधली दीवानी मस्तानी या गाण्याची कोरियोग्राफी केली होती. या गाण्यासाठी रेमोला पहिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. तो म्हणाले, “रणवीर तू त्या गाण्यात पूर्ण वेळ बसून होतास, त्यावेळी मला तुझ्यासाठी कोरियोग्राफी करता आली नव्हती. तुझ्यासोबत लवकरच एक पूर्ण डान्सिंग नंबर करण्याची मला आशा आहे आणि आपण लवकरच भविष्यात एकत्र काम करू.”
रणवीर आणि साराच्या जोडीचा सिम्बा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील प्रदर्शित झालेल्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. आंख मारे’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आहे. हे गाणे अर्शद वारसीचे हिट सॉन्ग ‘आंख मारे और लडकी आंख मारे...’ चे रिमिक्स व्हर्जन आहे. हे नवे व्हर्जन मिका सिंग व नेहा कक्कडने गायले आहे. गाण्यात काही ठिकाणी कुमार सानूचा आवाजही आहे.
धर्मा प्रॉडक्शन व रोहित शेट्टी प्रॉडक्शनचा हा सिनेमा येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘सिम्बा’हा सिनेमा साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. ‘सिम्बा’या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.