निहलानींना हटवा, व्यवस्था बदला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 04:18 PM2016-06-14T16:18:46+5:302016-06-14T21:48:46+5:30
‘उडता पंजाब’ या चित्रपटावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिटला. पण तरिही हा वाद पूर्णपणे ...
‘ डता पंजाब’ या चित्रपटावरून निर्माण झालेला गोंधळ अखेर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मिटला. पण तरिही हा वाद पूर्णपणे शमला असे म्हणता येणार नाही. कारण आता ‘उडता पंजाब’चे सहनिर्माते अनुराग कश्यप यांनी थेट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटविण्याची मागणी पुढे रेटली आहे. केवळ एवढेच नाही तर सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आमूलाग्र बदल करण्याची मागणीही केली आहे. अर्थात कश्यप यांच्या या मागणीला उत्तर देताना निहलानी यांनी स्वत:चा जोरदार बचाव केला आहे. मी नियमानुरूपच कार्य केले, असे त्यांनी म्हटले आहे. आज पत्रपरिषदेत कश्यप यांनी निहलानींना हटविण्याची मागणी केली.पण सोबत निहलानी यांना त्या पदावरून काढून प्रश्न सुटणार नाही. यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण व्यवस्थाच बदलावी लागेल, असे कश्यप म्हणाले. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.