कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....
By अमित इंगोले | Published: September 22, 2020 11:46 AM2020-09-22T11:46:26+5:302020-09-22T12:00:18+5:30
आता रेणुका शहाणे यांनी भावना व्यक्त केली की, आता जे काही वाद-विवाद सुरू आहेत आणि जे काही घडत आहे त्याचा सुशांत केससोबत काहीही संबंध नाही. यावरून रेणुका शहाणे यांनी कंगना रणौतवर टिका केली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी यावर आपापली मते मांडत आहेत अभिनेत्री रेणुका शहाणे सुद्धा या मुद्द्यावरून सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत राहिली आहे. आता त्यांनी भावना व्यक्त केली की, आता जे काही वाद-विवाद सुरू आहेत आणि जे काही घडत आहे त्याचा सुशांत केससोबत काहीही संबंध नाही. यावरून रेणुका शहाणे यांनी कंगना रणौतवर टिका केली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका वेबसाइटशी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांत केस तेव्हा मागे पडली जेव्हा कंगना रणौतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला टार्गेट करणं सुरू केलं होतं. आणि कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. त्या म्हणाल्या की, हे सगळे मुद्दे सुशांत केसशी संबंधित नाहीत. सुशांतच्या मुद्द्यावर कंगनाचीही पहिली प्रतिक्रिया हीच होती की, हे सगळं नेपोटिज्मच्या कारणाने झालं.
रेणुका शहाणे यांनी कंगनाने उर्मिला मातोंडकरवर केलेल्या वक्तव्यावरही टिका केली. कंगनाने उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. यावर रेणुका शहाणे म्हणाल्या की, कंगनाने शालीनतेची सीमा पार केली आहे आणि ती या सर्व बेकार गोष्टी तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बोलत आहे. रेणुका असंही म्हणाल्या की, त्यांना कंगनाकडून कोणत्याही संवेदनशीलतेची अपेक्षा राहिलेली नाही.
दरम्यान, सुशांतच्या केसमध्ये सीबीआयसोबतच एनसीबी आणि ईडी तपास करत आहे. आता या केसमध्ये ड्रग्सच्या अॅंगलने तपास सुरू आहे. ज्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. एनसीबीने आधी रिया चक्रवर्तीसहीत ६ लोकांना अटक केली आहे. आता अशी माहिती आहे की, लवकरच एनसीबीकडून अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी केली जाऊ शकते.
आधीही केली होती कंगनाची कानउघाडणी
रेणूका शहाणेने ट्विट केले होते की, जरी मला कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नाही. तरीही सूडभावनेने पालिकेने केलेल्या उद्धवस्तेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. @CMOMaharashtra कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण महारोगराईचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?'.
Though I did not like @KanganaTeam 's comment comparing Mumbai to POK I am appalled by the revenge demolition carried out by @mybmc You do not have to stoop so low. @CMOMaharashtra please intervene. There is a pandemic we are dealing with. Do we need this unnecessary drama?
— Renuka Shahane (@renukash) September 9, 2020
दरम्यान रेणुका शहाणेने याआधी कंगनाने केलेल्या पीओकेच्या मुद्द्यावरून तिला उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असे म्हणत खडेबोल सुनावले होते. त्यानंतर कंगना आणि रेणुका यांच्यामध्ये ट्वीटवॉर देखील पाहायला मिळाले होते.
हे पण वाचा :
'हा ड्रामा गरजेचा आहे का?' कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर रेणुका शहाणेने साधला सरकारवर निशाणा
‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला...’; रेणुका शहाणे कंगना राणौतवर भडकली
...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार