प्रद्युम्नच्या हत्येचा खुलासा ऐकून रेणुका शहाणेला बसला धक्का, फेसबुकवर लिहिली पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 04:56 PM2017-11-09T16:56:11+5:302017-11-09T22:26:26+5:30
गुरूग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणात सीबीआयकडून खुलासे करण्यात आले आहेत. या खुलाशांमुळे प्रद्युम्नच्या परिवारासह सर्वांनाच धक्का ...
ग रूग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न हत्या प्रकरणात सीबीआयकडून खुलासे करण्यात आले आहेत. या खुलाशांमुळे प्रद्युम्नच्या परिवारासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे हिलादेखील सीबीआयच्या या खुलाशामुळे धक्का बसला असून, तिने सोशल मीडियावर एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्याला झालेल्या वेदना शेअर केल्या.
रेणुकाने लिहिले की, ‘मला माहिती आहे की, तुम्ही सर्वांनीच प्रद्युम्नच्या मारेकºयांबद्दल ऐकले असेल. सीबीआयने एका अकरावीत शिकणाºया विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ज्याने सात वर्षाच्या एका निरागस मुलाचा गळा यामुळे आवळला जेणेकरून सुट्या मिळतील, परीक्षा रद्द होतील आणि पीटीएम होऊ नये. मला ही बाब आणखी त्रस्त करते की, सध्या हिंसेला शांत समजले जात आहे आणि ग्रेडच्या रेसमध्ये आपण मानवता पिछाडीवर सोडली आहे. स्कूलचे मॅनेजमेंट आणि गुरूग्राम पोलिसांनी हे प्रकरण अतिशय वाईट पद्धतीने हाताळले आहे. कारण त्यांनी एका अशा व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न केला जी निर्दोष आहे. तिचा गुन्हा केवळ एवढाच होता की, ती गरीब आहे.’
">रेणुकाने लिहिले की, ‘मला माहिती आहे की, तुम्ही सर्वांनीच प्रद्युम्नच्या मारेकºयांबद्दल ऐकले असेल. सीबीआयने एका अकरावीत शिकणाºया विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. ज्याने सात वर्षाच्या एका निरागस मुलाचा गळा यामुळे आवळला जेणेकरून सुट्या मिळतील, परीक्षा रद्द होतील आणि पीटीएम होऊ नये. मला ही बाब आणखी त्रस्त करते की, सध्या हिंसेला शांत समजले जात आहे आणि ग्रेडच्या रेसमध्ये आपण मानवता पिछाडीवर सोडली आहे. स्कूलचे मॅनेजमेंट आणि गुरूग्राम पोलिसांनी हे प्रकरण अतिशय वाईट पद्धतीने हाताळले आहे. कारण त्यांनी एका अशा व्यक्तीला अडकविण्याचा प्रयत्न केला जी निर्दोष आहे. तिचा गुन्हा केवळ एवढाच होता की, ती गरीब आहे.’
पुढे रेणुकाने लिहिले की, ‘आता वेळ आली आहे की, इंटरनॅशनल स्कूलला झोपेतून जागे केले जावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून योग्य शिक्षण दिले जाईल. मला अपेक्षा आहे की, कोणीतरी या श्रीमंतांना समजावूून सांगायला हवे की, पैसाच सर्व काही नाही. पैशाने चांगले संस्कार आणि आणि चांगले शिक्षण विकत घेता येत नाही. यशाचा शॉर्टकट नसतो. आरआयपी प्रद्युम्न!’ रेणुकाने या अगोदरदेखील प्रद्युम्नच्या हत्येसंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती.
सीबीआयने गेल्या बुधवारी त्यांच्या तपासाविषयी सांगितले की, प्रद्युम्नची हत्या त्याच्याच शाळेतील एका अकरावीच्या विद्यार्थ्याने केली आहे. जेणेकरून सुट्या मिळाव्यात व परीक्षा रद्द व्हाव्यात. सीबीआयच्या या खुलाशानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.