सामंथा रूथ प्रभूचं आयटम सॉन्ग पाहून पुरूषांसाठी काम करणारी संस्था भडकली, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:28 PM2021-12-13T12:28:16+5:302021-12-13T12:28:49+5:30

Samantha Ruth Prabhu Item Song Oo Antava Oo Oo Antava : ‘पुष्पा’ या सिनेमात सामंथा ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम सॉन्गवर थिरकताना दिसणार आहे. याच  गाण्याविरूद्ध पुरूषांसाठी काम करणाºया एका संस्थेने तक्रार दाखल केली आहे.

Reported That An Organization For Men In Andhra Has Filed A Case Against Samantha Ruth Prabhu Item Song | सामंथा रूथ प्रभूचं आयटम सॉन्ग पाहून पुरूषांसाठी काम करणारी संस्था भडकली, तक्रार दाखल

सामंथा रूथ प्रभूचं आयटम सॉन्ग पाहून पुरूषांसाठी काम करणारी संस्था भडकली, तक्रार दाखल

googlenewsNext

साऊथ स्टार सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) गेल्या कही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत तिच्या पर्सनल लाईफमध्ये अनेक गोष्टी घडल्या. आधी नागा चैतन्यसोबत घटस्फोट, मग या घटस्फोटावरून तिच्यावर झालेली टीका असा सगळा घटनाक्रम राहिला. आता काय तर सामंथाच्या आयटम सॉन्गविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमात सामंथा ‘उ अंतावा उ उ अंतावा’ (Oo Antava Oo Oo Antava) या आयटम सॉन्गवर थिरकताना दिसणार आहे. याच  गाण्याविरूद्ध पुरूषांसाठी काम करणा-या एका संस्थेने तक्रार दाखल केली आहे. या गाण्याच्या बोलांवर संबंधित संस्थेनं आक्षेप नोंदवला आहे. गाण्यात पुरुषांची घाणेरडी विचारसरणी दाखवण्यात आली आहे. जणू ते नेहमी फक्त सेक्सबद्दलच विचार करतात. त्यामुळे या गाण्यावर बंदी आणण्याची मागणी संस्थेने केली आहे.
 या आयटम साँगसाठी सामंथाने म्हणे मोठी रक्कम वसूल केली आहे.

होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा’मधील काही मिनिटांच्या डान्स नंबरसाठी सामंथाने 1.5 कोटी रुपए इतके मानधन घेतलं आहे. अर्थात याबाबत अधिकृत माहिती नाही.
सामंथाचा नुकताच घटस्फोट झाला. गेल्याच महिन्यात सामंथाने नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केले होतं. लग्नाच्या 4 वषार्नंतर दोघेही विभक्त झाले होते.लग्नानंतर सामंथाने तिचे सिनेमा करिअर सुरु ठेवले होते. सिनेमात बोल्ड सीन्स देणे, इतकंच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची. हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना खटकत होती, असं म्हटलं जातंय.अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर सामंथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती. सामंथाला हा विरोध, ही बंधनं खटकतं होती आणि याच कारणामुळे तिने नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे.

घटस्फोटानंतर लगेच सामंथाने ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला. ‘पुष्पा’ हा सिनेमा तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Reported That An Organization For Men In Andhra Has Filed A Case Against Samantha Ruth Prabhu Item Song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.