या कारणामुळे महमूद रागावले होते अमिताभ बच्चन यांच्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:37 PM2018-07-24T12:37:07+5:302018-07-24T12:41:02+5:30

महमूद आणि अमिताभ बच्चन यांचे तर संबंध खूपच चांगले होते. अमिताभ बच्चन यांना ते आपला मुलगा मानत आणि त्यामुळेच बॉम्बे टू गोवा या चित्रपटात अमिताभ यांना त्यांनी काम करण्याची संधी दिली.

This is a reson why Mehmood was angry on Amitabh Bachchan | या कारणामुळे महमूद रागावले होते अमिताभ बच्चन यांच्यावर

या कारणामुळे महमूद रागावले होते अमिताभ बच्चन यांच्यावर

googlenewsNext

महमूद यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एक काळ असा होता की, महमूद चित्रपटातील नायकांपेक्षा जास्त पैसा घेत असत. महमूद चित्रपटात असले की, चित्रपट हा हिटच होणार असे त्यावेळेचे समीकरण होते. त्यामुळे चित्रपटात महमूद यांचा एक खास सीन ठेवला जात असे. महमूद चित्रपटात आहेत हे कळल्यावर त्या गोष्टीची त्या काळातील प्रसिद्ध हिरो देखील धास्ती घ्यायचे आणि चित्रपटातून स्वतःचे नाव लगेचच मागे घ्यायचे. 
महमूद आणि अमिताभ बच्चन यांचे तर संबंध खूपच चांगले होते. अमिताभ बच्चन यांना ते आपला मुलगा मानत आणि त्यामुळेच बॉम्बे टू गोवा या चित्रपटात अमिताभ यांना त्यांनी काम करण्याची संधी दिली. पण महमूद यांच्या उतारवयात अमिताभ आणि त्यांच्या नात्यात कटूता आली होती. महमूद यांच्या आयुष्यातील एक प्रसंग ते कधीच विसरू शकत नाहीत. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे ब्रीच कँडी रुग्णालयात होते. त्याचवेळी महमूद यांची बायपास सर्जरी झाल्याने त्यांना देखील त्याच रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. पण अमिताभ त्यांना भेटायला गेले नव्हते. या गोष्टीचे महमूद यांना खूप वाईट वाटले होते. 
महमूद यांचे कॉमिक टायमिंग, संवाद म्हणण्याची पद्धत हे सगळे प्रेक्षकांना भावत होते. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. महमूद यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी पैसे कमवण्यासाठी अनेक छोटी- मोठी कामं केली. ते दिग्दर्शक पीएल संतोषी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम केले होते. त्यासाठी त्यांनी ७५ रुपये मानधन मिळत असे. एवढेच नव्हे तर मीनाकुमारी यांना टेनिसचे धडे देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. त्या काळात मीना कुमारी आणि मेहमूद यांची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे त्यांनी बी आर चोप्रा यांना महमूद यांना एका चित्रपटात घेण्याविषयी सांगितले होते. पण मीना कुमारी यांनी महमूद यांचे नाव सुचवल्याचे त्यांना आवडले नाही. त्यामुळे त्या चित्रपटातून ते बाहेर पडले. यानंतर त्यांची मैत्री गुरुदत्त यांच्यासोबत झाली. त्यांनी प्यासा या चित्रपटात त्यांना एक छोटीशी भूमिका दिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 

Web Title: This is a reson why Mehmood was angry on Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.