SHOCKING! अभिनेत्री रेवती संपतच्या पोस्टने खळबळ; 14 लोकांवर केला लैंगिक शोषणाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 18:06 IST2021-06-17T18:05:04+5:302021-06-17T18:06:35+5:30
रेवतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर 14 लोकांची एक यादी जारी केली आहे. या 14 लोकांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

SHOCKING! अभिनेत्री रेवती संपतच्या पोस्टने खळबळ; 14 लोकांवर केला लैंगिक शोषणाचा आरोप
मल्याळम अभिनेत्री रेवती संपत (Revathy Sampath) हिच्या एका फेसबुक पोस्टमुळे साऊथ इंडस्ट्रीत सध्या एकच खळबळ माजली आहे. रेवतीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर 14 लोकांची एक यादी जारी केली आहे. या 14 लोकांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या यादीत अभिनेता सिद्दीकी, दिग्दर्शक राजेश टचरिवर, एक डॉक्टर व एका सब-इन्स्पेक्टरसह अन्य अनेकांची नावं आहेत.
‘मी येथे प्रोफेशनल/ वैयक्तिक व सायबर स्पेसच्या माध्यमातून गैरवर्तन करणा-यांच्या नावांचा खुलासा करतेय. ज्यांनी आत्तापर्यंत माझे शारिरीक, मानसिक व भावनिक शोषण केले,’ असे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. (Revathy Sampath Reveals Names Of People Who Harassed Her)
तिने जारी केलेल्या यादीत राजेश टचरिवर (डायरेक्टर), सिद्दीकी (अॅक्टर), आशिक माही (फॉटोग्राफर), शिजू ए. आर (अॅक्टर), अभिल देव (केरळ फैशन लीग, संस्थापक), अजय प्रभाकर (डॉक्टर), एम. यसएसएस, सौरभ कृष्णन (साइबर बुली), नंदू अशोकन ( डीवाईएफआय युनिट कमेटी सदस्य, नेदुमकाड), मैक्सवेल जोस (शॉर्ट फिल्म चा डायरेक्टर ), शानूब करुवथ और चाकोस केक (अॅड डायरेक्टर) आदींची नावे आहेत.
अभिनेता सिद्दीकीवर मी याआधीही आरोप केला होता. पण त्याच्याविरोधात अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही, असेही रेवतीने म्हटले आहे. तिची ही पोस्ट तुफान व्हायरल होतेय. काही याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत तर काहींनी या यादीतील लोकांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहेत.