रियाला सीबीआयचा दणका, म्हणाले - सुशांतच्या बहिणींवर लावलेले आरोप काल्पनिक...
By अमित इंगोले | Published: October 29, 2020 09:31 AM2020-10-29T09:31:37+5:302020-10-29T09:33:31+5:30
सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यावर दोघींनी पिटिशन फाइल केली होती.
सीबीआयने बुधवारी बॉम्बे हायकोर्टात सांगितले की, रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींवर जे आरोप लावले ते काल्पनिक आहेत. रियाने आरोप लावला होता की, सुशांतच्या बहिणींनी सुशांतसाठी खोटं मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केलं होतं.
सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यावर दोघींनी पिटिशन फाइल केली होती. यावर सीबीआयने सांगितले की, अशा शक्यता एफआयआरचा आधार होऊ शकत नाही. (अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींची याचिका फेटाळा, रिया चक्रवर्तीची उच्च न्यायालयाला विनंती)
रियाने काय केले होते आरोप?
सुशांतची गर्लफ्रेन्ड रियाने आरोप लावला होता की, जून महिन्यात आत्महत्या करण्याआधी एक चुकीचं प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला. जेणेकरून सुशांत नाकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सब्सटेंसेस अॅक्टनुसार बॅन केलेली औषधे घेऊ शकेल. सीबीआयने सांगितले की, सध्या एफआयआरमध्ये जे आरोप आहेत त्यातील जास्तीत जास्त काल्पनिक आहेत.
तपास यंत्रणेने सांगितले की, सुशांतचे वडील के के सिंह यांनी रिया आणि तिच्या परिवाराविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्याचा तपास सुरू आहे. सुशांतच्या बहिणींचे वकिल माधव थोरट यांच्या माध्यमातून ६ ऑक्टोबरला याचिका दाखल करण्यात आली होती. जी एफआयआर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात करण्यात आली होती. ते रद्द करण्यात आली आहे. (अंकिता लोखंडने रिया चक्रवर्तीला मारला टोमणा?, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट)
सीबीआय काय म्हणाले?
सीबीआयकडून सांगण्यात आले की, 'पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याआधी सुरूवातीला तपास करायला हवा. एकाच गोष्टीसाठी दोन एफआयआर दाखल केल्या जाऊ शकत नाही. आम्ही सुशांतच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहोत. हे बघता मुंबई पोलिसांकडून अपेक्षा केली जात होती की, ते रियाची तक्रार आम्हाला फॉरवर्ड करतील. ते स्वत: एफआयआप दाखल करणार नाहीत'.
रियाने चॅटची माहिती आधीच द्यायला हवी होती
सीबीआयकडून सांगण्यात आले की, जर रियाला सुशांत आणि बहीण प्रियंकात जून २०२० मध्ये झालेल्या मोबाइन फोन चॅटबाबत माहीत होते आणि त्याच दरम्यान प्रियंकाने सुशांतला खोटं प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं तर रियाने सप्टेंबरपर्यंत यावर मौन बाळगायला नको होतं. आता या केसची पुढील सुनावणी ४ नोव्हेंबरला होईल.