8 वर्षांत 7 सिनेमे, पण सगळेच फ्लॉप;  तरीही  इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:41 PM2020-08-09T14:41:58+5:302020-08-09T14:43:40+5:30

ईडीच्या चौकशीत झाला संपत्तीचा खुलासा

rhea chakraborty annual income 14 lakh but she owns 2 flats in mumbai |  8 वर्षांत 7 सिनेमे, पण सगळेच फ्लॉप;  तरीही  इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

 8 वर्षांत 7 सिनेमे, पण सगळेच फ्लॉप;  तरीही  इतक्या कोटींची मालकीण आहे रिया चक्रवर्ती

googlenewsNext
ठळक मुद्देसलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रियाकडे असलेल्या संपत्तीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे, रिया चक्रवर्ती. कधीकाळी सुशांतची गर्लफ्रेन्ड राहिलेल्या रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर दाखल केला आहे.  रिया चक्रवर्तीबद्दल सांगायचे तर रियाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बोटावर मोजण्याइतके सिनेमे केलेत. त्यातही सर्वच्या सर्व फ्लॉप. तरीही तिच्याकडे कोट्यावधी रूपयांची संपत्ती आहे.

 रियाचे वडील आर्मीत डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी. तिला एक भाऊ असून त्याचे नाव शेविक आहे. या चौघांवरही सुशांतप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणुकीचा आरोप आहे.

  2009 मध्ये एमटीव्हीच्या ‘टीन दीवा’ या रिअ‍ॅलिटी शेमध्ये ती फर्स्ट रनर अप होती. यानंतर तिने दिल्लीत एमटीव्हीच्या व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी आॅडिशन दिले आणि पाठोपाठ सिलेक्टही झाली.

व्हीजे म्हणून तिने कॉलेज बीट, टिकटॅक सारखे प्रोग्राम होस्ट केलेत. टीव्ही प्रोग्राम होस्ट केल्यानंतर रियाला अ‍ॅक्टिंग करिअर खुणावू लागले.

व्हीजे असताना रिया इंजिनिअरिंग करत होती. मात्र अ‍ॅक्टिंग करिअरसाठी तिने इंजिनिअरिंग सोडले. 2012 मध्ये तिला पहिला ब्रेक 2012 मिळाला. तिने तेलगू फिल्म ‘तुनीगा तुनीगा’तून पदार्पण केले. मात्र चित्रपट प्लॉप झाला.

2013 मध्ये रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘मेरे डॅड की मारुती’ हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला. 

2014मध्ये ‘सोनाली केबल’ सिनेमात काम केले, मात्र हा सिनेमाही दणकून आपटला. यानंतर सलग 3 वर्षे रियाला कुठलेही काम नव्हते. 

2017 मध्ये तिला ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ आणि ‘दोबारा- सी योर इव्हिल’ या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या. पण हे सिनेमही फ्लॉप ठरलेत.

यानंतर आलेल्या ‘बँकचोर’ आणि 2018 मध्ये ‘जलेबी’ या सिनेमात रियाची लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून वर्णी लागली. पण हे सिनेमेही  कमाल दाखवू शकले नाहीत.

गेल्या 8 वर्षांत म्हणजे 2012 ते 2020 या काळात रियाने एकूण 7 सिनेमे केलेत. पण यातला एकही सिनेमा हिट नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांचे रियाचे इन्कम टॅक्स रिटर्न बघितले असता तिचे वार्षिक उत्पन्न 10 ते 14 लाखांच्या आसपास आहे.  तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे.  मुंबईत तिचे दोन फ्लॅट आहेत.

सलग 7 फ्लॉप चित्रपट देऊनही रियाकडे असलेल्या संपत्तीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रियावर सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटीही फेरफार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.  
 

Web Title: rhea chakraborty annual income 14 lakh but she owns 2 flats in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.