रिया चक्रवर्ती असलेल्या भायखळा जेलचा असा आहे इतिहास, इंद्राणी मुखर्जी ते हसीना पारकर होत्या याच तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 03:45 PM2020-09-09T15:45:21+5:302020-09-09T15:56:08+5:30

रियाला भायखळ्याच्या तुरूंगात पाठवण्यात आले आहे.

Rhea chakraborty brought to byculla jail by ncb | रिया चक्रवर्ती असलेल्या भायखळा जेलचा असा आहे इतिहास, इंद्राणी मुखर्जी ते हसीना पारकर होत्या याच तुरुंगात

रिया चक्रवर्ती असलेल्या भायखळा जेलचा असा आहे इतिहास, इंद्राणी मुखर्जी ते हसीना पारकर होत्या याच तुरुंगात

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला बुधवारी तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तुरूंगात पाठवलं आहे. रियाला भायखळ्याच्या तुरूंगात पाठवण्यात आले आहे. हे एक महिला तुरूंग आहे जी ब्रिटिशकालीन आहे. या तुरूगांत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमटी बहीण हसीना पारकर, नेवी ऑफिसरची हत्या करणारी आरोपी मारिया सुसाइराज, ड्रग्स रेकॅट चालवणारी बेबी पाटणकर, शीना बोरा प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी या तुरुगांत राहिल्या आहेत. इंद्राणी मुखर्जी अजूनही या तुरुंगात आहे. या तुरुगांत फक्त  10 टक्के  पुरुष कर्मचारी आहेत बाकी सर्व कर्मचारी महिला आहेत.

रियावर याकलमांतर्गत गुन्हे दाखल

रिया हिच्यावर एनपीडीएस अ‍ॅक्टच्या कलमांतर्गत अमली पदार्थांचे सेवन करणे, बाळगणे आणि ते इतरांना पुरविण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी ईडीने तिच्या मोबाईल चॅटचा तपास केला असताना ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने त्याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून चौघांना जामीन मिळाला आहे. अटक केलेल्यांमध्ये सुशांतसिंहशी थेट संबंधित रिया, तिचा भाऊ शौविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि नोकर दीपेश सावंत यांचा समावेश आहे.

बॉलिवूडच्या कलाकार रियाच्या समर्थनात
दुसरीकडे रिया चक्रवर्तीला अटक झाल्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तिच्या समर्थनात समोर आले आहेत. यात करीना कपूर, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, स्वरा भास्कर, अभय देओल, अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यांनी रियाला सपोर्ट करणारे मेसेजे सोशल मीडियात शेअर केले आहेत.

ईडी, सीबीआयच्या तावडीतून सुटून एनसीबीच्या जाळ्यात!

सुशांतसिंहच्या वडिलांनी पटणा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतील गुन्हा सीबीआयकडे वर्ग झाल्यावर ईडीने याप्रकरणी मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल केला. रियाकडे शेकडो तास चौकशी केली त्यानंतर सीबीआयकडूनही अनेकदा चौकशी झाली. त्यातून सहीसलामत बाहेर पडलेली रिया ‘एनसीबी’च्या गुन्ह्यात मात्र अडकली.

रिया चक्रवर्तीने कोर्टात सांगितलं, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटी करतात ड्रग्सचं सेवन....

 

Web Title: Rhea chakraborty brought to byculla jail by ncb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.