तुरुंगात रिया चक्रवर्तीला करावा लागला होता नागिन डान्स, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 14:23 IST2023-10-06T14:22:43+5:302023-10-06T14:23:17+5:30
Rhea Chakraborty : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला बराच काळ उलटल्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बरेच खुलासे केले आहेत. तिने तुरुंगातलेही अनुभव शेअर केले आहेत.

तुरुंगात रिया चक्रवर्तीला करावा लागला होता नागिन डान्स, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेली रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २०२० हे वर्षे तिच्यासाठी खूप वाईट ठरले होते. नुकतेच रियाने या तीन वर्षात तिला आलेला अनुभव मुलाखतीत शेअर केला. तिने सुशांतबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, सुशांतच्या निधनानंतर तिला कसे लोकांच्या द्वेषाला सामोरे जावे लागले. तसेच तिने तुरुंगातील त्या दिवसांच्या काळ्या आठवणींबद्दलही सांगितले.
इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२३च्या दरम्यान रिया चक्रवर्तीने सांगितले की, आता ती ड्रग्स आणि आत्महत्यावर बोलून वैतागली आहे. ती म्हणाली की, जे होईल जसे काही होईल ते सर्व एजेंसी ठरवणार. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते त्यांचा निर्णय देतील.
तुरूंगात रियाला आले हे अनुभव
या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने तुरुंगातील अनुभवदेखील शेअर केले. ती म्हणाली की, तो खूप कठीण काळ होता. तुरुंगात राहणे सोपे नव्हते. तुरुंगातील जग खूपच वेगळे असते. ते तुमची ओळख हिरावून घेते आणि फक्त एक नंबर दिला जातो. त्यावेळी सगळं काही संपलं आहे, असे वाटू लागते आणि तुम्ही कोलमडू लागता.
कैद्यांकडून हे शिकलं पाहिजे...
रिया पुढे म्हणाली की, त्या घाणेरड्या जगात लोक खूश आहेत. मला तिथे राहणाऱ्या महिलांकडून आनंदी राहण्याची शिकवण मिळाली. जेव्हा तुरुंगात एक समोसा वाटला जायचा तेव्हा तो पाहून सगळे खूश व्हायचे. एक समोसा पाहून त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक पाहायला मिळायची. आपल्याला त्यांच्याकडून हे शिकले पाहिजे. आपण बाहेर जगातील बऱ्याच गोष्टींसाठी तरसत असतो आणि ते या सगळ्यात आनंदी राहतात.
जेव्हा रियाने तुरुंगात केला नागिन डान्स...
रिया चक्रवर्तीने सांगितले की, तिने त्या महिलांसाठी नागिन डान्सदेखील केला. ती म्हणाली की, मी त्या सर्वांना वचन दिले होते की जेव्हा मला जामिन मिळेल तेव्हा मी नागिन डान्स करेन. मात्र जेव्हा वेळ आली मला फक्त बेल मिळाली. माझा भाऊ तेव्हाही आतच होता. अशात जेलरनेदेखील म्हटलं होतं राहू दे. मात्र मला वाटले की आज जर मी अशीच गेली तर त्यांचे मन तुटेल. मग मी त्या सर्वांसाठी नागिन डान्स केला. मी तो क्षण विसरु शकत नाही. सर्व महिला माझ्यासोबत जमिनीवर लोळून नागिन डान्स करत होती.