रिया चक्रवर्तीनेही पुढे केला कोरोना पिडीतांना मदतीचा हात, म्हणाली......

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:18 AM2021-04-24T11:18:20+5:302021-04-24T11:22:57+5:30

कोरोना रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहून रिया चक्रवर्तीही अत्यंत दुःखी झाली आहे. तिने या परिस्थितीत कोरोना पिडीतांना मदतीचा हात देऊ केला आहे.

Rhea Chakraborty To Help People Amid COVID-19 Crisis, Says 'Tough Times Call For Unity' | रिया चक्रवर्तीनेही पुढे केला कोरोना पिडीतांना मदतीचा हात, म्हणाली......

रिया चक्रवर्तीनेही पुढे केला कोरोना पिडीतांना मदतीचा हात, म्हणाली......

googlenewsNext

देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहून रिया चक्रवर्तीही अत्यंत दुःखी झाली आहे. तिने या परिस्थितीत कोरोना पिडीतांना मदतीचा हात देऊ केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. पोस्ट शेअर करत तिने म्हटले आहे की, अशा कठिण काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र यायला हवे, प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करण्याची गरज आहे.

 

मदत ही मदत असते त्यात लहान मोठी असे काही नसते.मी जर कोणालाही कसल्याही प्रकारची मदत करु शकते तर मला नक्कीच मसेजे करा.मी माझ्या परिने मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन.अशा वेळी प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या, विनम्र राहा देव प्रत्येकाला शक्ती देवो अशी प्रार्थना तिने या पोस्टच्या माध्यमातून केली आहे.


सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरु गायब झाली होती. मात्र काही महिन्यांपासून ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. सुशांतच्या निधनाला रियाला जबाबदार ठरवण्यात आले त्यामुळे रिया चक्रवर्तीला नेटीझन्स पसंत करत नाहीत. तिला पाहताच तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसतात. अशात आता रिया चक्रवर्तीचा ही पोस्ट चर्चेत आहे.

‘चेहरे’च्या पोस्टर्समधून का गायब आहे रिया चक्रवर्ती चेहरा? निर्मात्याने दिले उत्तर

आगामी काळात रिया चक्रवर्ती 'चेहरे' सिनेमात झळकणार आहे. पण पोस्टरमध्ये कुठेही रियाचा नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सिनेमात रिया आहे की नाही असा प्रश्न सध्या सा-यांसमोर आहे. सिनेमात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी,अन्नू कपूर,रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहे. रुमी जाफरीने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्यांनी गुन्हा दाखल केला होता.

 

यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची तपास यंत्रणांनी कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली खरी. पण बॉलिवूडमध्ये तिचे कमबॅक होणार का? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

Web Title: Rhea Chakraborty To Help People Amid COVID-19 Crisis, Says 'Tough Times Call For Unity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.