रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:36 AM2020-09-08T09:36:39+5:302020-09-08T09:37:11+5:30

एनसीबी ड्रग्स अ‍ॅंंगलने रियाची विचारपूस करत आहे. यादरम्यान सुशांतचा मित्र आणि केसच्या मुख्य साक्षीदाराने रियाबाबत अनेक खुलासे केले आहेत आणि ड्रग्सबाबतही सांगितलं आहे.

Rhea Chakraborty inner circle gave heavy drugs to Sushant reveals a key witness | रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतला ड्र्ग्सचा हाय डोज द्यायची, सुशांतच्या मित्राने केला खुलासा!

googlenewsNext

एनसीबी सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्सच्या अ‍ॅंंलने तपास करत आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि स्टाफ मेंबर दीपेश सावंत याना अटक केली आहे. तिघेही सध्या एनसीबीच्या रिमांडवर आहेत. तेच एनसीबी ड्रग्स अ‍ॅंंगलने रियाची विचारपूस करत आहे. यादरम्यान सुशांतचा मित्र आणि केसच्या मुख्य साक्षीदाराने रियाबाबत अनेक खुलासे केले आहेत आणि ड्रग्सबाबतही सांगितलं आहे.

टाइम्स नाउ चॅनलला सुशांत सिंह राजपूतच्या मित्राने सांगितले की, रिया चक्रवर्तीच्या इनर सर्कलने सुशांतला जास्त प्रमाणात ड्रग्स दिलं आणि त्याला हेवी डोज घेण्यासाठी भाग पाडलं. सुशांतच्या मित्राने कथितपणे असंही सांगितलं की, रियाने सुशांतची लाइफ पूर्णपणे कंट्रोल करून ठेवली होती.

रिया म्हणाली - कधीही ड्रग्स घेतलं नाही

दरम्यान, रविवारी केलेल्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्तीने मान्य केलं की, तिने ड्रग्स खरेदी केलं आणि घरात जेही ड्रग्स आलं ते केवळ सुशांत सिंह राजपूतसाठी होतं. तिने कधीही ड्रग्सचं सेवन केलं नाही. दुसरीकडे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले की, रिया अटकेसाठी तयार आहे आणि कोणत्याही ब्लड टेस्टमधून हे सिद्ध होईल की, तिने कधीही ड्रग्स घेतलं नाही.

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाची तक्रार

रिया चकवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यानुसार अभिनेत्रीने सुशांतची बहीण प्रियांका सिंह विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोप आहे की, प्रियांकाने डॉक्टरचं खोटं प्रिस्क्रीप्शन तया केलं आणि बेकायदेशीर औषध खरेदी करण्यासाठी सुशांतला प्रिस्क्रीप्शन दिलं.

वडिलांच्या संपर्कात होता सुशांत

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतचे कॉल रेकॉर्डसमोर आले आहे. त्यात सुशांत वडिलांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. सुशांतने वडिलांनी 2020 मे महिन्यात 3 वेळा कॉल केला होता. तर 6 जूनला त्याने वडिलांना व्हॉट्सअॅप चॅट कॉल केला होता. कॉल रेकॉर्डनुसार सुशांतने वडिलांना 3 वेळा कॉल केलेला तर वडिलांनी एक वेळा कॉल केला होता. रियाला एनसीबीने उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे. 

रियाला अश्रू अनावर

एबीपीच्या रिपोर्टनुसार, रविवारी झालेल्या चौकशी दरम्यान जेव्हा रियाचा सामना भाऊ शौविकशी झाला तेव्हा बहीण-भाऊ दोघे भावूक झाले. दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले. रिया आणि शौविकच्या या इमोशनल कार्डमुळे एनसीबीला त्यांची चौकशी वेळेपूर्वीच संपवावी लागली. रिपोर्टनुसार, शौविकला पाहून रिया रडू लागली आणि शौविकच्या डोळ्यातूनही पाणी येऊ लागले. 

हे पण वाचा :

सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

NCBच्या ऑफिसमध्ये भाऊ शौविकला पाहून ढसाढसा रडू लागली रिया, लवकर संपवावी लागली चौकशी

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, या कारणांमुळे होऊ शकते अटक

Web Title: Rhea Chakraborty inner circle gave heavy drugs to Sushant reveals a key witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.