रिया चक्रवर्तीच्या चॅटमधून झाला ड्रग्ज संदर्भात खुलासा, वकील म्हणाले- रिया ब्लड टेस्टसाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:29 AM2020-08-26T10:29:00+5:302020-08-26T10:34:39+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवं खुलासे होतायेत.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवं खुलासे होतायेत. मंगळवारी या प्रकरणातील एक मोठा खुलासा झाला. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अमलीपदार्थ सेवन व तस्करीत सहभाग असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ईडी ) आहे. रियाकडून जप्त केलेल्या दोन मोबाईलपैकी एकामधील व्हाट्सअपचॅटमध्ये अमली पदार्थाबाबत अस्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ड्रग्जचे सेवन व ती मागविण्यात तिचा कनेक्शन आहे का, या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकालाही कळविण्यात आले आहे. मात्र राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीच्या वकीलने प्रकरण उघडकीस आल्यानंतर वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदेने म्हणाल्या की, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. पुढे ते म्हणाले की, रिया चक्रवर्ती तिची रक्त तपासणी करण्यासही तयार आहे. रियाने ड्रग्जच्या संदर्भात 4 लोकांशी केलेले चॅट डिलीट केले आहेत.
विशेष पथकाने मंगळवारी सुशांतचा लेखा परीक्षक (सीए) संदीप श्रीधर आणि मित्र सिद्धार्थ पिठानी, यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या गेस्ट हाऊस येथे डीआरएच्या संदीप श्रीधर व सुशांतच्या परिचयातील तिघांना चौकशीसाठी केली. ईडीकडून मिळालेला दस्ताऐवज, सुशांतचे बँक अकाउंटचे डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक, आयटीआरबद्दल सविस्तर तपशील सीएकडून माहिती करून घेतला.