रियाला कशी मिळाली होती सुशांतच्या मृत्यूची बातमी? डेड बॉडी पाहून का म्हणाली होती, सॉरी बाबू?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 04:35 PM2020-08-27T16:35:06+5:302020-08-27T16:37:02+5:30
यावेळी तिने तिला सुशांतच्या मृत्यूची बातमी कशी मिळाली याबाबत सांगितले. हे सांगत असताना ती भावूकही झाली होती.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड आहे. तसेच रिया ही सुशांतच्या केसमधील मुख्य आरोपीही आहे. रियाने पहिल्यांदाच आजतकला मुलाखत देत सुशांतच्या केसबाबत वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि तिच्यावर लावलेल्या आरोपांना फेटाळले. यावेळी तिने तिला सुशांतच्या मृत्यूची बातमी कशी मिळाली याबाबत सांगितले. हे सांगत असताना ती भावूकही झाली होती. तसेच ती सुशांतची डेड बॉडी पाहून सॉरी बाबू का म्हणाली होती हेही सांगितले.
कशी मिळाली मृत्यूची बातमी?
रियाने सांगितले की, '१४ जूनच्या दुपारी साधारण २ वाजता मी माझ्या रूममध्ये होते. माझ्यासोबत माझा भाऊही होता. माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला की, अशाप्रकारच्या अफवा सुरू आहेत. या अफवा लगेच बंद पाडायला सांग. तिला हे नव्हते माहीत की, मी माझ्या घरी परत आले आहे. तेव्हा मला विचार आला की, अशी अफवा कशी असू शकते. १० ते १५ मिनिटाने कुठूनतरी बातमी कन्फर्म झाली होती. मी ढासळले होते. माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की, असं कसं होऊ शकतं. मी पूर्णपणे शॉक्ड होते. म्हणून मी त्याच्या घरी गेले नाही'.
अंत्यसंस्काराला का गेली नाही?
सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याबाबत रियाने सांगितले की, 'मला सांगण्यात आलं होतं की, फ्यूनरलच्या लिस्टमध्ये माझं नाव नाहीय. सुशांतच्या परिवाराला मला तिथे बघायचं नव्हतं. मी फ्यूनरलला जाण्यासाठी तयार होते. माझ्या एका मित्राने सांगितले की, तू तिथे जाऊ शकत नाही. तुला काढून देण्यात येईल. तुझा अपमान केला जाईल. माझ्या दोन मैत्रीणी म्हणाल्या की, तू सुशांतची बॉडी बघणं फार गरजेचं आहे. जेणेकरून मला क्लोजर मिळावं आणि मी सुशांतचा मृत्यू स्वीकार करू शकेन'.
बॉडी पाहून सॉरी बाबू का म्हणाली?
रियाला मुलाखतीत विचारण्यात आले की, पोस्टमार्टेमवेळी तू सुशांतची बॉडी पाहिली होती आणि तू सॉरी बाबू का म्हणाली? यावर तिने उत्तर दिलं की, 'हो मी सॉरी बाबू म्हणाले आणि तिथे कोण म्हणणार? जर कुणाचा जीव गेला होता, आय अॅम सॉरी तू जीव गमावला. आजही मी सॉरी आहे की, अशाप्रकारच्या गोष्टी होत आहेत. मृत्यूची खिल्ली उडवली जात आहे. मी सॉरी आहे कारण आज त्याच्या कामाला आठवलं जात नाहीये'.
हे पण वाचा:
रिया म्हणाली - 'माझी बस एकच चूक झाली', पहिल्यांदाच मीडियासमोर मांडली तिने तिची बाजू!
...म्हणून सुशांत घेत होता औषध, रियाने उघड केलं यूरोप ट्रिपचं आणखी एक गुपित!
माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया
इटलीतील त्या 'पछाडलेल्या' हॉटेलमध्ये रात्री काय घडलं?; रियानं सांगितली 'भीतीदायक' गोष्ट