रिया चक्रवर्तीची देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात; दुबईतील मंदिरात घेतलं दर्शन, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 16:45 IST2024-01-02T16:42:50+5:302024-01-02T16:45:08+5:30
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देवाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात केली आहे.

रिया चक्रवर्तीची देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात; दुबईतील मंदिरात घेतलं दर्शन, पाहा व्हिडीओ
2023 वर्ष संपलं आणि आजपासून नव्या वर्षाला म्हणजेच 2024 ला सुरुवात झाली. जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. अनेक जण एकमेकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच सेलिब्रिटी, दिग्गज नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. यातच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देवाच्या दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
रियाने दुबईत नव्या वर्षाची सुरुवात केली आहे. दुबईतील एका मंदिरात रिया पोहचली. तिथे तिने देवाचा आशीर्वाद घेतला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रिया दुबईतील एका मंदिरात दर्शनासाठी लाइनमध्ये उभी असलेली दिसते आहे. यात ती देवासमोर डोके टेकवतानाही दिसली. रियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केलं.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्याच्या आत्महत्येला पूर्णपणे तिलाच जबाबदार ठरवलं गेलं. ऐवढचं नाही तर तिला या प्रकरणी जेलमध्येही जावं लागलं होतं. जामीन मिळाल्यानंतर आता कुठे रियाचं आयुष्य पूर्वपदावर येतंय.