तिला तिचे स्वातंत्र्य द्या...! ब्रिटनी स्पीअर्ससाठी मैदानात उतरली रिया चक्रवर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 12:37 PM2021-06-25T12:37:44+5:302021-06-25T12:41:01+5:30
रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. सध्या रियाच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
अमेरिकन पॉप स्टार ब्रिटनी स्पीअर्सला (britney spears) कोण ओळखत नाही? तूर्तास ही ब्रिटनी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मला माझे स्वातंत्र्य परत पाहिजे, म्हणत तिने आपल्या वडिलांविरूद्धच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ब्रिटनी 445 कोटींची मालकीण आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहे. ब्रिटनीला आता यातून मुक्तता हवी आहे. अशास्थितीत सोशल मीडियावर ब्रिटनीच्या चाहत्यांनी ‘FreeBritney’ नावाची मोहिमच उघडली आहे. आता काय तर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ही सुद्धा ब्रिटनीच्या बाजुने मैदानात उतरली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य द्या, अशी रियाची पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. (Rhea Chakraborty support american singer Britney Spears demand to free her)
ब्रिटीनीला स्वातंत्र्य द्या अशी मागणी तिनं केली आहे. रियाने तिच्या इन्स्टा अकाऊंट स्टोरी शेअर केली आहे. ‘तिला स्वतंत्र करा,’ असे तिने यात म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामुळे रिया चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात ती संशयीत आरोपी आहे. या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात तिला अटक देखील झाली होती. या पार्श्वभूमीवर सध्या रियाच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे.
काय आहे ब्रिटनीचे प्रकरण
ब्रिटनी म्हणायला जगातील दिग्गज स्टार आहे. पण तिचे वडील जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या पर्सनल लाईफबद्दलचे सर्व निर्णय घेतात. गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनी नैराश्येमध्ये होती. या काळात वडील तिच्या संपत्तीची देखभाल करत होते. पण आता वडिलांचा हस्तक्षेप ब्रिटनीला नकोसा झाला आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पैशावर कायदेशीर अधिकार हवा आहे. मला माझे स्वातंत्र्य परत हवे आहे, असे म्हणत, तिने कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. माझे वडील घोटाळेखोर आहेत. त्यांना तुरुंगात टाका,अशी विनंती देखील तिने कोर्टात केली. बुधवारी लॉस एंजिल्स कोर्टात तिच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी ब्रिटनीने तिची व्यथा सांगितली. यादरम्यान कोर्टाबाहेर आणि सोशल मीडियावर चाहते ब्रिटनीला समर्थन देत होते.