महेश भट्ट यांच्यासोबत ८ जूनला झालेल्या चॅटींगवर रिया चक्रवर्तीने दिलं स्पष्टीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 09:44 AM2020-08-28T09:44:41+5:302020-08-28T09:45:16+5:30
सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती या केसमधील मुख्य आरोपी झाली आहे. रियाने एका न्यूज चॅनलला पहिल्यांदाच मुलाखत दिली असून तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.
सुशांत सिंह राजपूतचा रहस्यमय मृत्यू बॉलिवूडमधील सर्वात जास्त वादग्रस्त मुद्दा ठरत आहे. सीबीआयच्या तपास वेगाने सुरू आहे. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती या केसमधील मुख्य आरोपी झाली आहे. रियाने एका न्यूज चॅनलला पहिल्यांदाच मुलाखत दिली असून तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.
'मी दु:खी होते कारण मला सुशांत परत बोलवलं नाही'
रियाने मुलाखतीत महेश भट्ट यांच्यासोबतच्या चॅटीगबाबतही खुलासा केलाय. असे सांगितले गेले होते की, रियाने भांडणानंतर ८ जूनला सुशांतचं घर सोडलं होतं आणि त्यानंतर तिचं महेश भट्ट यांच्यासोबत बोलणं झालं होतं. रियाने सांगितले की, 'मी परेशान होते आणि दु:खी होते. कारण सुशांतने मला परत बोलवलं नाही. त्याने कॉल बॅक केला नाही. आमच्यात इतकंच होतं का? की मी आजारी होते म्हणून त्याला माझ्यापासून दूर रहायचे होते?'.
महेश भट्टसोबत झालेल्या संवादाबाबत ती म्हणाली की, त्यांच्यासोबत झालेल्या संवादाचा सुशांत आणि त्यांच्या नात्याचं काहीही देणं घेणं नाही.
रियाने याआधी सांगितल्या प्रमाणे तिला डिप्रेशनची समस्या होती आणि त्याचा तिच्या मानसिक आरोग्यावर फार प्रभाव पडला होता. ८ जूनला तिचं आणि सुशांतचं भांडण झालं होतं. ज्यानंतर ती आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. त्याच दिवशी रियाने महेश भट्ट यांनी मेसेज केला होता की, 'सर आएशा जड मनाने आणि शांततेत पुढे निघाली आहे. तुमच्यासोबत शेवटी झालेल्या बोलण्याने माझे डोळे उघडले होते. तुम्ही तेव्हाही आणि आताही माझ्यासाठी देवदूतासारखे आहात'.
रियाने महेश भट्ट यांना केलेल्या मेसेजवर रिप्लाय आला होता की, 'आता मागे वळून बघू नकोस. आता जे गरजेचं आहे ते कर. तुझ्या वडिलांना माझं प्रेम दे आणि ते आता आनंदी होतील'.
कशी मिळाली मृत्यूची बातमी?
रियाने सांगितले की, '१४ जूनच्या दुपारी साधारण २ वाजता मी माझ्या रूममध्ये होते. माझ्यासोबत माझा भाऊही होता. माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला की, अशाप्रकारच्या अफवा सुरू आहेत. या अफवा लगेच बंद पाडायला सांग. तिला हे नव्हते माहीत की, मी माझ्या घरी परत आले आहे. तेव्हा मला विचार आला की, अशी अफवा कशी असू शकते. १० ते १५ मिनिटाने कुठूनतरी बातमी कन्फर्म झाली होती. मी ढासळले होते. माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की, असं कसं होऊ शकतं. मी पूर्णपणे शॉक्ड होते. म्हणून मी त्याच्या घरी गेले नाही'.
अंत्यसंस्काराला का गेली नाही
सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याबाबत रियाने सांगितले की, 'मला सांगण्यात आलं होतं की, फ्यूनरलच्या लिस्टमध्ये माझं नाव नाहीय. सुशांतच्या परिवाराला मला तिथे बघायचं नव्हतं. मी फ्यूनरलला जाण्यासाठी तयार होते. माझ्या एका मित्राने सांगितले की, तू तिथे जाऊ शकत नाही. तुला काढून देण्यात येईल. तुझा अपमान केला जाईल. माझ्या दोन मैत्रीणी म्हणाल्या की, तू सुशांतची बॉडी बघणं फार गरजेचं आहे. जेणेकरून मला क्लोजर मिळावं आणि मी सुशांतचा मृत्यू स्वीकार करू शकेन'.
हे पण वाचा :
रियाला कशी मिळाली होती सुशांतच्या मृत्यूची बातमी? डेड बॉडी पाहून का म्हणाली होती, सॉरी बाबू?
सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला