रिया चक्रवर्तीने निखिल कामथसोबतचं नातं केलं ऑफिशियल?, कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 17:41 IST2023-10-21T17:41:01+5:302023-10-21T17:41:50+5:30
Rhea Chakraborty : अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री अलीकडेच तिचा कथित बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत स्पॉट झाली आहे.

रिया चक्रवर्तीने निखिल कामथसोबतचं नातं केलं ऑफिशियल?, कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली अभिनेत्री
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तुरुंगवास भोगलेली रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या लिंकअपच्या बातम्या येत आहेत. रिया बिझनेसमन निखिल कामथला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे त्यांच्या लिंकअपच्या चर्चां आता वेग आला आहे.
शुक्रवारी रात्री रिया चक्रवर्ती आणि निखिल कामथ एकत्र स्पॉट झाले होते, जिथे दोघे एकाच कारमध्ये बसलेले दिसले होते. कॅमेराकडे बघत असताना रिया वारंवार चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. हे दोघे रात्री उशिरा एका पार्टीला गेले होते. या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. लोक अभिनेत्रीला प्रचंड ट्रोल करत आहेत.
कोण आहे निखिल कामथ?
निखिल कामथ हे बिझनेस जगतात मोठं नाव आहे. त्याच्या मेहनतीमुळे आज तो अगदी लहान वयात कोट्यधीश झाला आहे. निखिल कामथच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची आणि त्याचा भाऊ नितीन यांची संयुक्त संपत्ती ३.४५ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २८ हजार कोटी रुपये आहे.
मानुषी छिल्लरलाही केलंय डेट
बिझनेसमन निखिल कामथचा घटस्फोट झाला आहे. २०१९ मध्ये, त्याने इटलीमध्ये देशातील एका मोठ्या हाऊसिंग ब्रँडची मालकीण अमांडा पूरवंकाराशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. निखिलचे नाव माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरशीही जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लर आणि निखिल कामथ काही काळ एकमेकांना डेट करत होते. दोघांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते.