या स्टार किडने सोशल मीडियावर पहिल्यांदाच शेअर केला बिकनीतील फोटो, नेहमीच राहाते लाईमलाईटपासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 04:11 PM2021-03-12T16:11:49+5:302021-03-12T16:16:39+5:30
या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अनिल कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये त्याचे प्रस्थ निर्माण केेले आहे. सोनम तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता तिच्या बहिणीने म्हणजेच रिया कपूरने पहिल्यांदाच तिचा बिकनीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
रिया कपूरने बिकनीतील फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, मी जाडी आहे असे मला नेहमीच वाटत होते. आपण आपल्या स्वतःसोबत कधीच जिंकू शकत नाही... पण आपण प्रयत्न तरी करू शकतो. कोणाला फरक पडतो हा सौंदर्याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
रिया एक फॅशन डिझाईनर आणि निर्माती आहे. आयशा, खुबसुरत, वीरे दे वेडिंग यांसारख्या चित्रपटांची तिने निर्मिती केली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. तिचा प्रियकर करण बुलानी हा क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि नेटफ्लिक्स सीरिजचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे. 2019 मध्ये अनिल कपूरने रियाच्या कथित बॉयफ्रेन्डची भेट घेतली होती. मुंबईच्या एका रेस्टॉरंटबाहेर त्यांना पाहिले गेले होते. या फॅमिली डिनरचे फोटोही व्हायरल झाले होते. अनेकदा करण अनिल कपूरच्या फॅमिली फंक्शनमध्ये दिसला आहे.
आयशा आणि वेक अप सिड या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करणने काम केले आहे.अलीकडे त्याने द ऑडिशन ही शॉर्ट फिल्म त्याने दिग्दर्शित केली होती. अनेक टीव्ही शोच्या प्रॉडक्शन टीममध्ये त्याने काम केले आहे. रियाच्या वाढदिवसाला त्याने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.