रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:33 IST2024-07-18T15:32:03+5:302024-07-18T15:33:17+5:30
लक्ष्मीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

रिचा चड्डा अन् अली फजल झाले आई-बाबा, दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने दिला लेकीला जन्म
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डाने (Richa Chadha) 16 जुलै रोजी म्हणजो दोन दिवसांपूर्वीच गोंडस मुलीला जन्म दिला. रिचा आणि अली फजलने (Ali Fazal) जॉइंट स्टेटमेंट रिलीज करत ही गुडन्यूज दिली. लक्ष्मीच्या आगमनाने दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. रिचा आणि लेकीच्या स्वागतासाठी कुटुंबीय सज्ज आहेत. तसंच रिचा आणि अलीच्या मुलीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अली फजल आणि रिचा चड्डाने आपल्या जॉइंट स्टेटमेंटमध्ये लिहिले की, "१६ जुलै २०२४ रोजी आमच्या घरी गोंडस मुलीचं आगमन झालं आहे. हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही सर्व हितचिंतकांचे त्यांच्या प्रेम आणि प्रार्थनेसाठी आभार मानतो."
कालच रिचा चड्डाने ड्रीमी मॅटर्निटी शूट पोस्ट केलं होतं. तसंच तिने या पोस्टचे कमेंट्स ऑफ ठेवले होते. मी सर्वात वैयक्तिक गोष्ट पोस्ट करत आहे म्हणून कमेंट्स सेक्शन ऑफ आहे असं तिने लिहिलं होतं. आता दोघंही आई बाबा झाले असून आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत.
रिचा आणि अली 2013 साली 'फुकरे'च्या सेटवर भेटले होते. तेव्हापासूनच ते एकमेकांना डेट करत आहेत. सप्टेंबर 2022 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. यावर्षीच्या सुरुवातीलाच रिचाने प्रेग्नंसीची गुडन्यूज दिली होती.
वर्कफ्रंट
अली फजलची नुकतीच 'मिर्झापूर 3' वेबसीरिज रिलीज झाली. सध्या सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहे. तर रिचा चड्डाही संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजमध्ये झळकली.