अखेर ठरला ‘या’ कपलच्या लग्नाचा मुहूर्त, सुरु झाली लगीनघाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:34 IST2020-02-13T13:31:40+5:302020-02-13T13:34:29+5:30
लवकरच बॅन्ड बाजा बारात...

अखेर ठरला ‘या’ कपलच्या लग्नाचा मुहूर्त, सुरु झाली लगीनघाई
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल जवळजवळ पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 74 व्या वेनिस फिल्म फेस्टिवलदरम्यान एकत्र रेड कार्पेटवर उतरत रिचा व अलीने आपले नाते जगजाहिर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसले. अर्थात लग्नाच्या प्रश्नावर मात्र दोघांनीही चुप्पी साधली होती. आता मात्र रिचा व अली दोघेही लग्नासाठी तयार आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
होय, येत्या जून वा जुलैमध्ये रिचा व अली लग्न करणार आहेत. लग्नाची नेमकी तारीख काय, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण चर्चा खरी मानाल तर या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. लग्नाच्या खरेदीचे फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत.
नुकत्याच बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल बोलली होती. अर्थात लग्नाचे प्लॅनिंग सांगण्याऐवजी आम्ही किती बिझी आहोत, हेच रिचाने सांगितले होते. ‘आमच्या लग्नाचे प्लानिंग करायचे झाल्यास संपूर्ण प्रॉडक्शन टीम लागेल. कारण सध्या आम्ही प्रचंड बिझी आहोत. अलीला स्वत:ला महिन्यातील पाच दिवस कसेबसे मिळतात. आम्ही कमिटमेंटला घाबरतो असे नाही. पण खरोखर आम्ही खूप बिझी आहोत. इतके की, आम्हाला एकमेकांना भेटायलाही वेळ नाही.
अनेकदा आम्ही महिन्यातून दोनदा भेटते. कधी कधी तर अंधेरी ते वांद्रे हे अंतरही लॉन्ग डिस्टंट असल्यासारखे वाटते. अली पहाटे पहाटे शहरात येतो आणि माझी मॉर्निंग शिफ्ट असते. त्यामुळे आम्ही फक्त व्हिडीओ कॉलवरून बोलतो. अशा परिस्थिती आम्ही लग्न कसे करू शकतो? असे रिचा म्हणाली होती. आता मात्र लॉन्ग डिस्टंट मिटवण्याचे रिचा व अलीने चांगलेच मनावर घेतल्याचे दिसतेय.