अक्षयकुमारच्या पुरस्कारावर ऋचा चढ्ढा दिली 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 05:13 PM2017-04-26T17:13:02+5:302017-04-26T22:43:02+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. ‘अलीगढ’चे दिग्दर्शक हंसल मेहता आणि ‘पिंक’चे ...
ब लिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. ‘अलीगढ’चे दिग्दर्शक हंसल मेहता आणि ‘पिंक’चे निर्माता शुजित सरकार यांनी असे म्हटले की, हा पुरस्कार मनोज वाजपेयी किंवा अमिताभ बच्चन यांना मिळायला हवा होता. आता या वादात अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिने उडी घेतली असून, तिने अक्षयकुमारला मिळालेल्या पुरस्काराचे समर्थन केले आहे.
‘खून आली चिठ्ठी’ या शॉर्ट लघुपटाविषयी बोलताना ऋचाने मत व्यक्त केले. ऋचाने ‘खून आली चिठ्ठी’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. जेव्हा ऋचाला अक्षयकुमारला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने तिचे स्पष्ट मत व्यक्त केले. ती म्हणाली की, ‘अक्षयला निवड समितीने अवॉर्ड दिला आहे, जर त्याला अवॉर्ड स्विकारणे पसंत असेल तर यावर वाद करण्यात अर्थ नाही’ ऋचाचे हे मत अक्षयला समर्थन देणारे असल्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये गट निर्माण होताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे प्रियांका चोपडा हिला देखील अक्षयला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराविषयी विचारण्यात आले. मात्र तिने यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले. मी अमेरिकेत असल्याने मला याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगत तिने या प्रश्नाला बगल दिली. दोन दिवसांपूर्वीच अक्षयने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘मी गेल्या २५ वर्षांपासून बघत आहे की, कोणालाही पुरस्कार मिळाला की, त्यावर खरपुस चर्चा रंगत असते. त्यामुळे माझ्यासाठी ही काही नवी बाब नाही. याला नाही, त्याला मिळायला हवा. तर ठिक आहे, मला २६ वर्षांनंतर मिळाला. अशातही जर तुम्ही यास विरोध करत असाल तर मग परत घ्या तो पुरस्कार’ अशा शब्दात अक्षयने राग व्यक्त केला होता.
असो, ऋचाच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये दोन गट निर्माण झाले असून, सध्या या पुरस्कारावरून वादंग निर्माण झाले आहे.