Shocking! अभिनेत्री रिचा चड्ढाची जीभ कापणाऱ्याला देणार बक्षीस, जीवे मारण्याचीही धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 10:39 AM2021-01-18T10:39:53+5:302021-01-18T10:40:40+5:30
‘मॅडम चीफ मिनिस्टर’चा वाद
अभिनेत्री रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा येत्या 22 जानेवारीला रिलीज होतोय. पण तत्पूर्वी हा सिनेमा वादात अडकला आहे. चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले आणि या चित्रपटाला विरोध सुरु झाला. या फोटोत रिचा हातात झाडू घेऊन उभी आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. केवळ आक्षेप नाही तर आता रिचाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. इतकेच नाही तर तिची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
एका मुलाखतीत रिचाने स्वत: याची माहिती दिली. तिने सांगितले, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा एका रिअल लीडरवर बनलेला आहे, या गैरसमजातून आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. माझे पोस्टर जाळण्याच्या, माझ्या घरावर हल्ला करण्याच्या, माझ्यावर गोळ्या झाडण्याच्या धमक्या मिळत आहेत. पण आम्ही या धमक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. धमक्या देणारे तेच लोक आहेत,ज्यांना प्रसिद्धी हवी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या धमक्यांना भीक न घालणे हाच त्यांना थोपवण्याचा उत्तम मार्ग आहे.
जीभ कापणाऱ्याला बक्षीस...
This is absolutely shameful & to be condemned in no uncertain terms. You can have ideological issues & problems with a film but this is criminal intimidation & incitement to violence. Ambedkarites, Dalit feminists & just sane people- stand up & call this out! @RichaChadha#NotOkhttps://t.co/sJs6c9V53J
— Swara Bhasker (@ReallySwara) January 17, 2021
अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट रिट्विट केले आहे. यात काही कात्रणं पाहायला मिळत आहेत. यात रिचा चड्डाची चीभ कापणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचे लिहिले आहे. स्वराने याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. ‘ ही खूप लज्जास्पद बाब आहे आणि या प्रकाराचा निषेध करायला हवा. एखाद्या चित्रपटाला तुमचा वैचारिक विरोध असू शकतो. पण हे म्हणजे थेट धमकावणे, हिंसाचारासाठी चिथावणी देणे आहे. आंबेडकारीवादी, दलित, स्त्रीवादी आणि केवळ समजूतदार लोकांनी याविरोधात उभे राहायला हवे,‘ असे स्वरा भास्करने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या सिनेमाचे एक पोस्टर अलीकडे रिलीज झाले होते. यात रिचा हातात झाडू घेऊन दिसली होती. या पोस्टरवर अनटचेबल, अनस्टॉपेबल असे लिहिण्यात आले होते. हे पोस्टर आणि त्यावरचा मजकूर वाचल्यानंतर अनेकांनी रिचा आणि निर्मात्यांवर कडाडून टीका केली होती. यानंतर रिचाने माफीही मागितली होती.
‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा सिनेमा उत्तर प्रदेशातील एका माजी मुख्यमंत्र्याच्या आयुष्यावर प्रेरित असल्याचे सांगितले जातेय. मेकर्सनी मात्र ही एक काल्पनिक कथा असल्याचे स्पष्ट केले आहे.