सध्या चित्रपट उद्योग भाजीबाजारासारखा झाला : धर्मेंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 02:12 PM2017-12-01T14:12:31+5:302017-12-01T19:42:31+5:30

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या मते, सद्यस्थितीत चित्रपट उद्योग भाजीबाजारासारखा झाला असून, कलाकार पैशांसाठी काहीही करण्यास एका पायावर तयार आहेत. ...

Right now the film industry has become a vegetable market: Dharmendra | सध्या चित्रपट उद्योग भाजीबाजारासारखा झाला : धर्मेंद्र

सध्या चित्रपट उद्योग भाजीबाजारासारखा झाला : धर्मेंद्र

googlenewsNext
ग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या मते, सद्यस्थितीत चित्रपट उद्योग भाजीबाजारासारखा झाला असून, कलाकार पैशांसाठी काहीही करण्यास एका पायावर तयार आहेत. ‘आजतक अजेंडा’मध्ये धर्मेंद्र यांनी चित्रपट उद्योगाच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. ८२ वर्षीय धर्मेंद्र यांनी सांगितले की, सध्याची चित्रपटसृष्टी त्यांच्या काळातील चित्रपट युगापेक्षा खूप वेगळी आहे. कारण सध्याच्या कलाकार पैशांसाठी काहीही करण्यास तयार आहेत. धर्मेंद्र यांनी म्हटले की, ‘सद्यस्थितीत हा उद्योग भाजीबाजार बनला आहे. ज्याठिकाणी भाजीपाला विकला जातो, विकत घेतला जातो अन् त्याची बोलीही लावली जाते. कलाकार तर कुठेही नाचत अन् गात आहेत. पैशासाठी काहीही करण्यास कलाकार एका पायावर तयार होत आहेत. सद्यस्थितीत कलाकारांसाठी पैसाच सर्वकाही आहे. आमच्या काळात असे अजिबातच नव्हते.

धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये तीनशेपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फूल और पत्थर, शोले, यादों की बारात, मेरा गाव मेरा देश, चुपके चुपके’ यासारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी नूतन, मीनाकुमारी, देव आनंद, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, संजीवकुमार, अमजद खान, जितेंद्र, जया बच्चन, शर्मिला टागोर, ओमप्रकाश, राखी यांसहित अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. परंतु बरेसचे सुपरहिट चित्रपट देऊनही त्यांना एकदाही सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला नाही. फिल्मफेअरने त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच बेस्ट टॅलेण्ट म्हणून एक पुरस्कार दिला होता. त्यानंतर त्यांना लाइफटाइम अचिव्हमेंट हा दुसरा पुरस्कार दिला. 

अवॉर्डविषयी सांगताना धर्मेंद्र म्हणाले की, ‘मी अवॉर्ड घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला असे सांगण्यात आले होते की, दिलीपकुमार मला अवॉर्ड देतील. मी दिलीपसाहब यांच्याकरिता त्याठिकाणी गेलो होतो. मला फिल्मफेअरविषयी काहीही देणेघेणे नाही. या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अवॉर्ड घेता आला पाहिजे, परंतु माझ्यात ती खुबी आणि चलाखी नाही असे मी समजतो. लोक अवॉर्ड मिळविण्यासाठी बरेचसे फंडे वापरतात. मी मात्र याच्या विरोधात आहे. सध्या धर्मेंद्र त्यांच्या आगामी ‘यमला पगला दीवाना-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

Web Title: Right now the film industry has become a vegetable market: Dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.