रात्री सात वाजेपर्यंत रिमा लागू करत होत्या ‘नामकरण’चे शूटिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 09:49 AM2017-05-18T09:49:59+5:302017-05-18T15:19:59+5:30
मराठी, हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये ‘आई’ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरूवार, दि.१८ मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ...
म ाठी, हिंदी मालिका, चित्रपटांमध्ये ‘आई’ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरूवार, दि.१८ मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्या ‘नामकरण’ या टीव्ही मालिकेचे शूटिंग करत होत्या. त्यानंतर त्या घरी गेल्या असता मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जावई विनय वायकुळ यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली.
रिमा लागू यांचे जावई विनय वायकुळ म्हणाले,‘रात्री १ वाजेपर्यंत त्या एकदम ठीक होत्या. मात्र, नंतर त्यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. मग आम्ही लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पहाटे ३:१५ वाजता त्यांनी प्राण सोडला.’ रिमा लागू या ‘नामकरण’ मालिकेत दयावंती मेहता यांची व्यक्तीरेखा साकारत होत्या. मालिकेच्या मुख्य कलाकाराची आई आणि आजी अशा दोन्ही भूमिका त्या साकारत होत्या. ‘श्रीमान श्रीमती’ आणि ‘तु तु मैं मैं’ या मालिकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांची मुलगी मृण्मयी ही एक उत्तम थिएटर आणि चित्रपट अभिनेत्री आहे.