दंगलने टाकले सुल्तानला मागे; ३०० कोटीहून अधिकचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 04:39 PM2017-01-05T16:39:12+5:302017-01-05T16:39:12+5:30
आमिर खानच्या ‘दंगल’ने कमाईमध्ये सलमान खानच्या सुल्तानला मागे टाकले. बुधवारी १३ व्या दिवशी दंगलची कमाई ३०० कोटीहून अधिक झाली ...
आ िर खानच्या ‘दंगल’ने कमाईमध्ये सलमान खानच्या सुल्तानला मागे टाकले. बुधवारी १३ व्या दिवशी दंगलची कमाई ३०० कोटीहून अधिक झाली आहे.
यापूर्वी सुलतानने ३००.४५ कोटींचा व्यवसाय केला होता. ट्रेड अॅनालिस्टच्या अनुसार दंगलने १३ व्या दिवशी ९.२३ कोटीचा व्यवसाय केला. या चित्रपटाने आतापर्यंत ३०४.३८ कोटींचा व्यवसाय केला आहे. या व्यवसायाबरोबरच २०१६ साली सर्वाधिक कमाई करणारा दंगल हा पहिला चित्रपट झाला आहे.
दंगलची कमाई पाहता, हा चित्रपट आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या चित्रपटाने भारतीय बॉक्स आॅफिसवर ३४०.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. पीकेची बरोबरी करण्यासाठी दंगलला आणखी ३६.४२ कोटींची कमाई करणे आवश्यक आहे. तत्पूर्वी दंगलची ‘बजरंगी भाईजान’सोबतही स्पर्धा आहे. या चित्रपटाचे भारतामधील एकूण कलेक्शन ३२० कोटी रुपये आहे.
ट्रेड अॅनालिस्टच्या अनुसार दंगलने पहिल्या आठवड्यात १९७.५४ कोटी, दुसºया आठवड्यात १०६.८४ कोटी (६ दिवस) असे ३०४.३८ कोटी रुपये कमावले आहेत. दुसºया आठवड्यात शुक्रवारी १८.५९ कोटी, शनिवारी २३.०७ कोटी, रविवारी ३२.०४ कोटी, सोमवारी १३.४५ कोटी, मंगळवारी १०.४६ कोटी आणि बुधवारी ९.२३ कोटी रुपयांची कमाई केली.
बॉलिवूडमध्ये आमिर खान हा नवनवीन विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय बॉक्स आॅफिसवर सर्वाधिक कमाई करणाºया हिंदी चित्रपटात पीके सर्वप्रथम आहे. आमिरचाच हा चित्रपट असल्याने दंगल हा चित्रपट पीकेला मागे टाकेल काय? हा प्रश्न आहे. केवळ १३ व्या दिवशी दंगलने ३०० कोटीचा आकडा पार केला. आता या आठवड्यात दंगल पीकेला मागे टाकू शकतो का? याबाबत आमिरच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.
दंगलची जोरदार पब्लिसिटी झाली आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून दंगलची क्रेझ वाढली आहे. महावीरसिंग फोगाट या कुस्तीगिराच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अनेक राज्यांनी या चित्रपटाला टॅक्स फ्री केले आहे. त्याशिवाय विविध कार्यक्रमाद्वारे हा चित्रपट पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.