Rishab Shetty : ऐकलं का? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीला रश्मिका नव्हे ‘या’ अभिनेत्रीसोबत करायचंय काम...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 05:54 PM2022-11-25T17:54:43+5:302022-11-25T17:55:05+5:30
Rishabh Shetty on Rashmika Mandanna : ऋषभ शेट्टीला रश्मिकासोबत काम करण्यात काहीही इंटरेस्ट नाही... हे तर नाही ना कारण?
‘कांतारा’ (Kantara ) या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) हे नाव चर्चेत आहे. ऋषभ शेट्टी यानेच ‘कांतारा’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. त्यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि तोच या कथेचा नायक आहे. म्हणजेच, चित्रपटात लीड रोलही त्यानेच साकारला आहे. 12 वर्षांपूर्वी ऋषभ शेट्टीने आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला होता तेव्हा एकदिवस आपण इतका मोठा स्टार बनू, असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण आज ऋषभ शेट्टी मोठा स्टार आहे. सगळेच त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. पण त्याचे विचार मात्र स्पष्ट आहेत. बॉलिवूडमध्ये काम करण्याची त्याची इच्छा नाही. शिवाय कोणत्या कलाकारांसोबत काम करायचं, कोणत्या नाही, याबाबतीतही त्याची मतं बरीच स्पष्ट आहेत.
अलीकडे एका मुलातखतीत ऋषभ आपल्या आवडत्या साऊथ अभिनेत्रींबद्दल बोलला. सामंथा रूथ प्रभु, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna),किर्ती सुरेश व साई पल्लवी यापैकी तुला कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायला आवडेल? असा प्रश्न या मुलाखतीत ऋषभला विचारण्यात आला. यावर त्याने रश्मिकाच्या नावावर अप्रत्यक्ष फुली मारली.
काय म्हणाला ऋषभ?
मी संपूर्ण कथा लिहिल्यानंतरच कलाकारांचा विचार करतो. तसं तर मला नवीन लोकांसोबत काम करायला आवडतं. कारण त्याचे काहीही नखरे नसतात. या अभिनेत्री मला आवडत नाही. अर्थात साई पल्लवी आणि सामंथाचं काम कला आवडतं. या दोघीही सच्च्या कलाकार आहेत. सामंथा आई साई या आत्ताच्या सर्वात प्रतिभावान अभिनेत्री आहेत, असं तो म्हणाला. रश्मिकाचं नाव घेणंही त्याने पसंत केलं नाही.
रश्मिकावरच्या रागाचं हे तर नाही ना कारण?
ऋषभ शेट्टीला रश्मिकासोबत काम करण्यात काहीही इंटरेस्ट नाही, हे तर स्पष्ट झालं आहे. यामागचं कारण काय, हे तसंच पुरेसं स्पष्ट नाही. पण सध्या सोशल मीडियावर रश्मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि ऋषभच्या रश्मिकावरच्या नाराजीचं कारण हा व्हिडीओ असल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.
व्हिडीओत रश्मिका तिच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल बोलतेय. मला अभिनेत्री होण्यात काहीही रस नव्हता. एक दिवस मला अचानक एका प्रॉडक्शन हाऊसचा कॉल आला, आधी हा प्रँक कॉल असल्याचं मला वाटलं.., असं रश्मिका या व्हिडीओत म्हणतेय. शिवाय त्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव न घेता फक्त इशारा करतेय.
मुळात रश्मिकाने ज्या प्रॉडक्शन हाऊसचा उल्लेख केला, ते परमवाह स्टुडिओ आहे. ऋषभ शेट्टीचा जवळचा मित्र आणि रश्मिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड रक्षित शेट्टी याचं हे प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसने रश्मिकाला पहिला ब्रेक दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अलीकडे रश्मिकाला ‘कांतारा’ पाहिलास का? असा प्रश्न पापाराझींनी विचारला होता. यावर नाही, मी नाही पाहिला, असं रश्मिका म्हणाली होती. यावरून ती जबरदस्त ट्रोल झाली होती.