११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 11:52 AM2020-04-30T11:52:11+5:302020-04-30T12:15:00+5:30

ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग त्यांच्यासोबत ११ महिने त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये होत्या.

Rishi kapoor comeback india 11 year cancer treatment neetu kapoor wife gda | ११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक

११ महिने ११ दिवस दिवसांनी कॅन्सवर उपचार करुन जेव्हा मुंबईत परतले होते ऋषी कपूर, झाले होते भावूक

googlenewsNext

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सरशी झुंज देते होते. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग त्यांच्यासोबत ११ महिने त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये होत्या. कॅन्सरशी झुंज देताना नीतू सिंग प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत होत्या. 

सप्टेंबर २०१९मध्ये ज्यावेळी ते मायदेशी परतले होते. त्यावेळी मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता. 


नीतू व ऋषी दोघांनीही हातात हात घालून कॅमेऱ्यांना पोज दिली आणि यानंतर दोघेही आपल्या गाडीत बसून घराकडे रवाना झाले होते. घरी परतल्यावर ऋषी यांनी टिष्ट्वटरवरून सर्वांचे आभार मानलेत. घरी परतलो. ११ महिने ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार, असे त्यांनी लिहिले.


न्यूयॉर्कमध्ये असताना बराच काल आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. याकाळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले.


अनेक ट्वीटमध्ये त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते. ‘या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. 
 

Web Title: Rishi kapoor comeback india 11 year cancer treatment neetu kapoor wife gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.