Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:54 AM2020-02-07T09:54:22+5:302020-02-07T10:26:03+5:30

Rishi Kapoor Hospitalized : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

rishi kapoor health update admitted in mumbai hospital | Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर

Rishi Kapoor Hospitalized : ऋषी कपूर  पुन्हा रूग्णालयात, भेटायला पोहोचला रणबीर

googlenewsNext
ठळक मुद्दे ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. येथे सुमारे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना पुन्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गत आठवड्यात अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. मात्र तिथून मुंबईत परतल्यानंतर गत सोमवारी त्यांना पुन्हा मुंबईच्याच एका रूग्णालयात भरती करण्यात आले.
सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर यांना व्हायरल झाल्याने त्यांना दक्षिण मुंबईच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात भरती केले गेले आहेत. तथापि त्यांची प्रकृती ठीक असून चिंतेचे काहीही कारण नाही.


दरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर वडिलांना भेटायला पोहोचला. रूग्णालयात जाताना त्याने चेह-यावर मास्क घातला होता.
ऋषी कपूर गेल्या वर्षी कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. येथे सुमारे ११ महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते. 
न्यूयॉर्कमधून उपचार घेऊन परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी ‘द बॉडी; या चित्रपटाद्वारे कमबॅक केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. लवकरच ऋषी कपूर दीपिका पादुकोणसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.  हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दीपिका व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

‘द इंटर्न’ हा हॉलिवूड सिनेमा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. रॉबर्ट डीनिरो आणि अ‍ॅन हाथवे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या हलक्या फुलक्या चित्रपटाने हॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच वेड लावले होते. हा चित्रपट एका 70 वर्षांच्या पात्राभोवती फिरतो. निवृत्तीनंतर आॅनलाईन फॅशन वेबसाईटमध्ये इंटर्न म्हणून तो दाखल होतो. ही भूमिका ऋषी कपूर साकारणार आहेत. तर  दीपिका त्यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसेल.  2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: rishi kapoor health update admitted in mumbai hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.