इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले ऋषी कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 10:56 AM2020-05-02T10:56:49+5:302020-05-02T10:57:28+5:30
ऋषी कपूर यांनी जवळपास 123 चित्रपटात काम केले होते.
‘मेरा नाम जोकर’ म्हणत बालवयातच सिनेसृष्टीला ऋषी कपूर यांनी आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवून दिली. कधी चॉकलेट हीरो तर कधी खलनायक अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. काळानुरूप अभिनयासोबत दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
कपूर खानदानाचे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात किती मोठे योगदान आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ऋषी कपूर यांनी जवळपास 123 चित्रपटात काम केले होते.
आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० कोटी जे जवळपास ३.७ मिलियन डॉलर इतके आहे. त्यांच्या कमाईशिवाय ऋषी कपूर यांच्याजवळ अनेक लक्झरी कार आहेत ज्याची किंमत जवळ जवळ ९.७ मिलियन डॉलर इतकी आहे. त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा विचार केला तर २०२० मध्ये निधनाच्या वेळी ऋषी कपूर यांची एकूण संपत्ती ४० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 300 कोटी इतकी होती.
चित्रपटच फक्त ऋषी कपूर यांचे कमाईचे एकमेव साधन नव्हते. ते चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तर होते. याशिवाय त्यांचे वेगवेगळ्या व्यावसायिक उद्योगातही भागीदारी होती. त्यांच्या कमाईचा काही हिस्सा जाहीरात व ब्रॅण्ड जाहीरातींमध्येही येतो.
ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये १९७० साली मेरा नाम जोकर सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी सिनेमातून अभिनेता म्हणून सुरुवात केली. बॉबीसाठी त्यांना १९७४ साली सर्वश्रेष्ठ अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्याना लाईफटाईम अचिव्हमेंटसहित अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७१ मध्ये त्यांना पहिल्या सिनेमासाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.
ऋषी कपूर यांनी पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत १२ सिनेमांमध्ये एकत्र काम केले. १९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते.
अग्निपथमध्ये साकारलेल्या खालनायकाच्या भूमिकेने त्यांनी सगळ्यांना हैराण केेले. इमरान हाश्मीसोबत द बॉडी सिनेमामध्ये ते शेवटचे दिसले . हा सिनेमा १३ डिसेंबर २०१९ला रिलीज झाला होता.