​ऋषी कपूर म्हणाले, मी रणबीरचा डॅड आहे, सेक्रेटरी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2017 06:59 AM2017-07-02T06:59:34+5:302017-07-02T12:29:34+5:30

आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर अलीकडे असेच काही बोलले. होय, मुलगा रणबीर कपूरबद्दल त्यांना विचारण्यात आले. ...

Rishi Kapoor said, "I am the father of Ranbir, not a secretary!" | ​ऋषी कपूर म्हणाले, मी रणबीरचा डॅड आहे, सेक्रेटरी नाही!

​ऋषी कपूर म्हणाले, मी रणबीरचा डॅड आहे, सेक्रेटरी नाही!

googlenewsNext
ल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर अलीकडे असेच काही बोलले. होय, मुलगा रणबीर कपूरबद्दल त्यांना विचारण्यात आले. रणबीरच्या करिअरमध्ये तुमची काय भूमिका आहे, असा प्रश्न ऋषी कपूर यांना विचारण्यात आला. यावर ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असताना ऋषी कपूर यांनी अचानक बॉम्ब फोडला. मी रणबीरच्या करिअरमध्ये अजिबात ढवळाढवळ करत नाही. मी त्याचा डॅड आहे, सेक्रेटरी नाही, असे ते म्हणाले. त्याच्या या उत्तराने प्रश्न विचारणाºयालाही निरूत्तर केले. स्वत:च्या करिअरबद्दल मात्र ऋषी कपूर मोकळेपणाने बोलले. माझा करिअरमध्ये मला धक्क्यावर धक्के बसले. कदाचित म्हणूनच मी लवकर सावरायला शिकलो. माझ्या यशामागे हेच खरे कारण आहे. अनेक धक्के बसले आणि यातून मी शिकत गेलो  व यातून घडत गेलो, असे ते म्हणाले.
करिअरमध्ये मी बरेच काही केले. अगदी अवार्ड्सही खरेदी केले. मला हे सांगताना कधीच लाज वाटली नाही. मी चुका केल्यात आणि त्या चुका कबूल करण्याची धमकही दाखवली, असे ते म्हणाले.

ALSO READ : 102 Not out : असा असेल अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा लूक!!

अलीकडच्या बॉलिवूडमधील नव्या ट्रेंडवरही ते बोलले. जिमचा आणि अ‍ॅक्टिंगचा काय संबंध हे मला अजूनही कळत नाही, असे ते म्हणाले. मी स्टारडमला बायबाय म्हटले, अ‍ॅक्टिंगला नाही, हेही त्यांनी सांगितले. १९७३ पासून १९९८ पर्यंत मी सलग २५ वर्षे काम केले. यानंतर मी कंटाळलो. कामाचे कुठलेही समाधान मिळेनासे झाले. माझे चित्रपट फ्लॉप चालले होते आणि मी लठ्ठही होत चाललो होतो. यानंतर नीतूने मला सल्ला दिला. आणखी काम करत राहशील तर काम एन्जॉय करू शकणार नाहीस, असे ती मला म्हणाली. मलाही पटले. हसत हसत रिटायर्ड व्हावे, नाहीतर प्रेक्षक जोडे मारतील, असे मला वाटले आणि मी स्टारडमला बाय बाय केले. अर्थात याचा अर्थ मी अभिनय सोडला असे नाही. १९९८ मध्ये मी अ‍ॅक्टिंगला नाही स्टारडम मागे सोडले होते, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Rishi Kapoor said, "I am the father of Ranbir, not a secretary!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.