ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना! चाहते चिंतीत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 10:07 AM2018-09-30T10:07:38+5:302018-09-30T10:08:30+5:30

ताज्या बातमीनुसार, ऋषी कपूर कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहेत आणि या आजारवरील उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत.

rishi kapoor takes leave from films for medical treatment in america urges to not speculate | ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना! चाहते चिंतीत!!

ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेला रवाना! चाहते चिंतीत!!

googlenewsNext

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ताज्या बातमीनुसार, ऋषी कपूर कुठल्या तरी आजाराने ग्रस्त आहेत आणि या आजारवरील उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना झाले आहेत.
खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी सांगितले. अर्थात त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 



 

‘हॅलो, मी वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात असल्याने कामातून लहानशी सुट्टी घेतोय. माझ्या शुभचिंतकांना मी इतकीच विनंती करेल की, कुठलीही चिंता करू नका आणि तर्क काढू नका. मी ४५ पेक्षा अधिक वर्षांपासून सतत काम करतोय. तुमचे प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभार. मी लवकरचं परत येईल..’, असे ट्विट त्यांनी केले.
साहजिकचं त्यांचे हे ट्विट वाचल्याबरोबर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. असंख्य चाहत्यांनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली़ अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत,अशा शुभेच्छा दिल्यात.
सूत्रांचे मानाल तर ऋषी कपूर यांची प्रकृती दीर्घकाळापासून खराब आहे. अलीकडे आऱ के़ स्टुडिओतील गणपती विसर्जन मिरवणुकीत ऋषी कपूर सहभागी झाले होते. ६६ वर्षांचे ऋषी कपूर, अलीकडे १०२ नॉट आऊट आणि मुल्क या चित्रपटांत दिसले. लवकरच त्यांचा राजमा चावल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात पिता-पुत्राची कथा आहे. नाराज मुलाशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेणाऱ्या पित्याची भूमिका त्यांनी यात साकारली आहे.

Web Title: rishi kapoor takes leave from films for medical treatment in america urges to not speculate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.