ऋषी कपूरची ही नायिका गेली अज्ञातवासात, तिच्याविषयी कोणाला माहीत असल्यास कळवा असे ऋषीने केले होते सोशल नेटवर्किंगवरून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 10:11 AM2018-05-07T10:11:03+5:302018-05-07T15:41:03+5:30
हम किसीसे कम नही हा ऋषी कपूरचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी ...
ह किसीसे कम नही हा ऋषी कपूरचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाचे संगीत आर डी बर्मन यांनी दिले होते तर चित्रपटातील गाणी किशोर कुमार, मोहम्म्द रफी आणि आशा भोसले यांनी गायली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. पण त्याचसोबत या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. ये लडका हाए अल्ला, क्या हुआ तेरा वादा, हम को तेरी यारी, बचना ए हसिनो यांसारखी सगळीच गाणी आजही प्रचंड हिट आहेत. या चित्रपटात ऋषी कपूरसोबत प्रेक्षकांना तारीक खान, काजल किरण यांसारखे कलाकार पाहायला मिळाले होते. काजल किरणचा तर हा पहिलाच चित्रपट होता. काजलच्या एका नातेवाईकांमुळे तिची नासिर हुसैन यांच्यासोबत भेट झाली आणि त्यामुळेच तिला हा चित्रपट मिळाला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच काजलला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळायला लागल्या होत्या. पण हम किसी से कम नही हा चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय कोणताही चित्रपट साइन करायचा नाही असे काजलच्या कॉन्ट्रक्टमध्ये लिहिले होते. त्यामुळे तिने अनेक चित्रपटांसाठी नकार दिला. हम किसी से कम नही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती चित्रपट स्वीकारू शकत होती. पण काजल चित्रपटांना नकार देत असल्याने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही तिला चित्रपटांच्या ऑफर्स येणे बंद झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ती करारबद्ध असल्याचा इंडस्ट्रीतील लोकांचा समज झाला होता. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिला वर्षभर काहीही काम मिळाले नाही. तिने त्यानंतर मांग भरो सजना, सबूत, वारदात यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तिने या चित्रपटानंतर मल्याळम, कन्नड, तमीळ चित्रपटांमध्ये काम केले. पण तिथे देखील तिच्या पदरी अपयशच आले.
चांगले चित्रपट मिळत नसल्याने काजलने १९९० मध्ये बॉलिवूड सोडले आणि लग्न केले. ती सध्या बाहेरगावी राहात असल्याचे म्हटले जाते. पण काजल कोणत्या देशात राहाते हे कोणालाच माहीत नाहीये. बॉलिवूड इंडस्ट्रीतील कोणाशीही तिचा संपर्क नाहीये. हम किसी से कम नही या चित्रपटातील तिचा नायक ऋषी कपूरने देखील दोन वर्षांपूर्वी त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काजलविषयी आवाहन केले होते. त्याने हम किसी से कम नही या चित्रपटातील त्या दोघांचा फोटो पोस्ट करून तिच्याविषयी कोणाला माहीत असल्यास कळवा असे लिहिले होते. तसेच तिचे खरे नाव सुनिता कुलकर्णी असल्याचे देखील त्याने ट्वीट मध्ये म्हटले होते.
Also Read : अन् २३ दिवसांनंतर पुन्हा ट्विटरवर परतले ऋषी कपूर! ‘हे’ आहे कारण!!