जया बच्चन यांची बहीण म्हटल्यावर भडकली होती ही अभिनेत्री, हे होते कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:51 AM2019-11-04T11:51:59+5:302019-11-04T11:53:41+5:30
4 नोव्हेंबर 1955 मध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने 71 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. 30 पेक्षा अधिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
अभिनेत्री रिटा भादुरी आज आपल्यात नाहीत. आज त्यांचा वाढदिवस. 4 नोव्हेंबर 1955 मध्ये जन्मलेल्या रिटा भादुरी यांनी 71 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. 30 पेक्षा अधिक मालिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. गतवर्षी 17 जुलैला त्यांचे निधन झाले.
अखेरच्या दिवसांत रिटा या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्यांना प्रत्येक दिवशी डायलिलिस करावे लागत होते. मात्र कौतुकास्पद बाब म्हणजे या कठीण दिवसांतही त्यांनी आपल्या मालिकेच्या शूटिंगमध्ये खंड पडू दिला नाही. सेटवर मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्या आराम करायच्या.
‘वृद्धापकाळात होणाºया आजारांना घाबरुन काम करणे सोडणे मला पटत नाही. आजाराविषयी सतत विचार करत बसणे मला पसंत नाही. यासाठी मी स्वत:ला कामात व्यस्त ठेवते,' असे मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
रिटा यांच्या आडनावामुळे लोक त्यांना जया भादुरी यांची बहीण समजायचे. 2011 मध्ये दिलेल्या मुलाखतीत रिटा यांनी स्वत: याबद्दल सांगितले होते. ‘अलीकडे मी जयपूरला गेले होते, तेव्हा तुम्ही जया भादुरीच्या बहीण आहात का? असा प्रश्न मला विचारला गेला होता. तो प्रश्न ऐकून मी प्रचंड संतापले होते. फिल्म इंडस्ट्रीत येऊन मला इतकी वर्षे झालीत. पण माझ्यात व जया यांच्यात काहीही संबंध नाही, हे अद्यापही लोकांना ठाऊक नाही. मी जयांची बहीण असल्याचा गैरसमज लोक करतात,’ असे त्या या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
रिटा यांनी टीव्ही मालिकांव्यतिरिक्त बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे. रिटा यांच्या दिल व्हिल प्यार व्यार, क्या कहना, होते होते प्यार हो गया, हिरो नं , बेटा यांसारख्या चित्रपटातील तर हद्द कर दी, अमानत, कुमकुम यांसारख्या मालिकेतील भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी छोट्या पडद्यावर स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.