रितेश देशमुख अन् जिनिलिया देशमुख साईचरणी; मुलांसह शिर्डीत जाऊन घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 20:32 IST2025-01-19T20:32:42+5:302025-01-19T20:32:55+5:30
रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी सहकुटुंब शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.

रितेश देशमुख अन् जिनिलिया देशमुख साईचरणी; मुलांसह शिर्डीत जाऊन घेतले दर्शन
Riteish Genelia Deshmukh in Shirdi: बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटांमध्येही आपली छाप उमटवणारे कलाकार म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh). हे मराठमोळं लोकप्रिय कपल प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. रितेश भाऊ आणि जिनिलिया वहिनींची गोष्टच न्यारी आहे. त्यामुळे जिथे कुठे जाईल तिथे या जोडप्याची चर्चा होते. प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकतंच रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी सहकुटुंब शिर्डीच्यासाईबाबांचं दर्शन घेतलं.
रितेश आणि जिनिलिया देशमुख हे मुलांसह शिर्डीत साईदरबारी नतमस्तक झाले. रितेशने साई समाधीचे मनोभावे दर्शन घेत विधीवत पूजाही केली. यावेळी रितेश आणि जिनिलिया हे पारंपारिक पोषाखात दिसले. तर मुलं रियान आणि राहिल यांनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. दोघे मंदिर परिसरात येताच त्याना बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे - सिनारे यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी मंदीर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
देशमुख कुटुंब साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. रितेशसह सर्वच देशमुख कुटुंबीय साईदरबारी हजेरी लावत असतात. त्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास Housefull 5 मध्ये पाहायला मिळणार आहे. साजिद नाडियादवाला निर्मित Housefull 5 मध्ये दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. तर जिनिलीया लवकरच आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात झळकणार आहे. २०२२ मध्ये 'वेड' हा तिचा पहिला मराठी सिनेमा केला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता येत्या काळात रितेश-जिनिलीया पुन्हा एकत्र काम केव्हा करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.