Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 17:31 IST2022-09-01T17:31:17+5:302022-09-01T17:31:47+5:30
Riteish Deshmukh : होय, यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली.

Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं खरेदी केली नवीकोरी अलिशान कार, किंमत कोटींच्या घरात
अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. रितेश हा सोशल मीडियावरही बराच सक्रीय आहे. बायको जेनेलियासोबतचे ( Genelia D'Souza ) त्याचे भन्नाट रिल्स क्षणात व्हायरल होतात. पण सध्या चर्चा त्याची नाही तर रितेश व जेनेलियाच्या नव्या कारची आहे.
होय, यंदाची गणेश चतुर्थी रितेश व जेनेलियासाठी चांगलीच खास ठरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश व जेनेलियाने नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. होय, बॉलिवूडच्या या मोस्ट लव्हिंग कपलने लक्झरी BMW iX ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. अर्पिता खान व आयुष शर्माच्या घरी गणपती पूजेसाठी याच रॉयल कारमधून कपलची एन्ट्री झाली.
रितेश व जेनेलिया मरून कलरच्या कारमधून आलेत आणि सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. रिपोर्टनुसार, या कारची किंमत 1.16 कोटी रूपये आहे. मुंबईत या कारची ऑनरोड प्राइज सुमारे 1.43 कोटी आहे.
रितेश कारचा शौकीन आहे. त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. यात मर्सिडीज बेंजपासून रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
रितेश व जेनेनियाची पहिली भेट 2003 मध्ये त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्यावेळी म्हणजे ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर झाली. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली होती आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं . तेव्हा जेनेलिया केवळ 16 वर्षांची होती तर रितेश 25 वर्षांचा होता. यानंतर जवळजवळ दहा वर्षे डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने शेवटी 3 फेब्रुवारी 2012 रोजी त्यांनी लग्न केलं. दोघांना रियान आणि राहिल हे दोन मुलं आहेत.