बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:15 PM2019-08-12T15:15:32+5:302019-08-12T15:16:59+5:30

सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला असताना बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीने अद्याप पुरग्रस्तांना मदत केली नव्हती. पण रितेश आणि जेनेलियाने मुख्यमंत्र्यांना भेटून नुकताच धनादेश दिला आहे.

Riteish Deshmukh and genelia d'souza give help to maharashtra flood victim | बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

बॉलिवूडमधून पुरग्रस्तांसाठी सगळ्यात पहिल्यांदा दिला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देबॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली आहे.

सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे.



 

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशाने पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रातून जगभर पसरणारे बॉलिवूड कुठं गेलंय? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे. लानत है उनपर, जिनके पास दानत नही है.... असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून बॉलिवूडला चांगलेच फटकारले होते. पण आता बॉलिवूडमधील मंडळी देखील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरसावली आहेत असे म्हणावे लागेल.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत केली आहे. त्यांनी २५ लाखांचा चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिला आहे.



 

समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण... महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत? असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी विचारला होता. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असं सांगणारे बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमाचं प्रदर्शन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही? या बॉलिवूड कलाकरांना कर्मभूमीचा विसर पडलाय, याचा संताप होतोय, असे म्हणत खोपकर यांनी मनसेच्यावतीने नाराजी व्यक्त केली होती. 



 

Web Title: Riteish Deshmukh and genelia d'souza give help to maharashtra flood victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.