Riteish Deshmukh : 'मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची...'; वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:54 PM2022-05-26T14:54:28+5:302022-05-26T14:56:58+5:30

अभिनेता रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या किती जवळ होता, सर्वांचं माहिती आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्यानं रितेश आणि त्याच्या कुटुंबात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Riteish Deshmukh became emotional in the memory of his father vilasrao deshmukh | Riteish Deshmukh : 'मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची...'; वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक

Riteish Deshmukh : 'मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची...'; वडिलांच्या आठवणीत रितेश झाला भावूक

googlenewsNext

महाराष्ट्राचे माजी दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज जयंती (२६ मे) आहे.  अभिनेता रितेश देशमुख यांनी वडिलांच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. या पोस्टसोबत रितेशने काही फोटोदेखील शेअर केलंत.

रितेशची वडिलांसाठी पोस्ट
रितेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे, मला तुमचा आशिर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचे आहे, माझ्या पाठीवर हात ठेवून, म्हणाता की, मी तुझ्यासोबत आहे तो क्षण पुन्हा अनुभवायचा.मला तुमचा हात धरायचा आहे, तुमच्यासोबत चालायचं आहे,मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ डे-पप्पा. मला तुमची आठवण येतं.' अशा शब्दांत रितेश देशमुखने विलासरावांच्या आठवणीने उजाळा दिला आहे.

अभिनेता रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या किती जवळ होता, सर्वांचं माहिती आहे. त्यांच्या अचानक निघून जाण्यानं रितेश आणि त्याच्या कुटुंबात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बऱ्याच वेळा रितेश आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो.  

एक प्रसन्न, दिलखुलास, अजातशत्रू, चतुरस्त्र अन् बेधडक नेतृत्व ही विलासरावांची खास ओळख. त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या समर्थकांच्या, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आजही कायम आहेत. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते, असं म्हणणारेही खूप जण आहेत.
 

 

Web Title: Riteish Deshmukh became emotional in the memory of his father vilasrao deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.