'वेड' लावलंय..!, 'भाऊचा बर्थ डे' म्हणत रितेश देशमुखला 'भाईजान' सलमान खानकडून हटके गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 01:55 PM2022-12-17T13:55:28+5:302022-12-17T13:56:05+5:30

Riteish Deshmukh And Salman Khan : रितेश देशमुखचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याला हटके बर्थडे गिफ्ट दिले आहे.

Riteish Deshmukh got a special gift from 'Bhaijaan' Salman Khan saying 'Bhaucha's birthday'. | 'वेड' लावलंय..!, 'भाऊचा बर्थ डे' म्हणत रितेश देशमुखला 'भाईजान' सलमान खानकडून हटके गिफ्ट

'वेड' लावलंय..!, 'भाऊचा बर्थ डे' म्हणत रितेश देशमुखला 'भाईजान' सलमान खानकडून हटके गिफ्ट

googlenewsNext

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया (Genelia Deshmukh). ते दोघे लवकरच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे वेड (Ved marathi Movie). नुकताच ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरने प्रेक्षकांना वेड लावले आणि आता हा सिनेमा वेड लावण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान आज रितेश देशमुखचा वाढदिवस असून यानिमित्ताने बॉलिवूडचा भाईजान सलमान खान(Salman Khan)ने हटके गिफ्ट दिले आहे. 

अभिनेता सलमान खानने रितेशचा आगामी चित्रपट वेडमधील वेड लावलंय.. या गाण्याचा टीझर शेअर करून त्याला अनोखं गिफ्ट दिले आहे. सलमानने गाण्याचा टीझर शेअर करत लिहिले की, भाऊचा बर्थडे आहे. रितेश देशमुख गिफ्ट तो बनता है... वेड लावलंय गाण्याच्या टीझरमध्ये रितेश आणि सलमान दोघे नाचताना दिसत आहेत. वेड लावलंय हे गाणं लवकरच भेटीला येणार आहे.  हा टीझर पाहून त्या दोघांना एकत्र डान्स करताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

रितेश देशमुखने वेड या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून जेनेलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. तसेच बऱ्याच वर्षानंतर ती रितेशसोबत रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात सलमान खान केमिओ करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता सलमान खानने वेड मधील गाण्याचा टीझर शेअर करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   

या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश-जेनेलियासोबत विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Riteish Deshmukh got a special gift from 'Bhaijaan' Salman Khan saying 'Bhaucha's birthday'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.