असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:53 AM2024-10-10T09:53:44+5:302024-10-10T09:54:42+5:30
सर्वच क्षेत्रातून रतन टाटांच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत.
ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांचं काल रात्री निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच क्षेत्रातून रतन टाटांच्या आठवणी जाग्या केल्या जात आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही (Riteish Deshmukh) ट्वीट करत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रितेश देशमुखने ट्वीट करत लिहिले,"असा माणूस पुन्हा होणे नाही. रतन टाटा आपल्यात नाहीत हे कळल्यावर प्रचंड दु:ख होत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांच्या दु:खात आपण सर्वच सामील आहोत."
असा माणूस पुन्हा होणे नाही. Deeply saddened to know that Shri #RatanTata ji is no more. Condolences to the family and loved ones. Rest In Glory Sir. 🙏🏽 pic.twitter.com/ldThYxUwJz
— Riteish Deshmukh (@Riteishd) October 9, 2024
रतन टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.