रितेश देशमुखने काव्यवाचन करण्याआधी काय केलं? अभिनेत्याच्या छोट्याश्या कृतीने मिळवली वाहवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:33 IST2025-02-28T16:32:37+5:302025-02-28T16:33:11+5:30

रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात त्याने केलेल्या छोट्याश्या कृतीने सर्वांचं मन जिंकलंय

riteish deshmukh pray for chhatrapati shivaji maharaj video viral praised by netizens | रितेश देशमुखने काव्यवाचन करण्याआधी काय केलं? अभिनेत्याच्या छोट्याश्या कृतीने मिळवली वाहवा

रितेश देशमुखने काव्यवाचन करण्याआधी काय केलं? अभिनेत्याच्या छोट्याश्या कृतीने मिळवली वाहवा

रितेश देशमुख (riteish deshmukh) हा मराठी आणि बॉलिवूड गाजवणारा लय भारी अभिनेता.  रितेशने आजवर विविध भूमिकांमध्ये अभिनय करुन लोकांचं प्रेम मिळवलंय. रितेशचे मराठी इंडस्ट्रीत रिलीज झालेले 'वेड' आणि 'लय भारी' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालंय. रितेश काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गेला होता. तिथे रितेशने केलेल्या एका छोट्याश्या कृतीने सर्वांचं मन जिंंकलं.

रितेशने असं काय केलं?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा रितेशचं नाव पुकारण्यात आलं. रितेशला व्यासपीठावर बोलावण्यात आलं. तेव्हा रितेशने काव्यवाचन सुरु करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार केला. याशिवाय ज्यांच्या नावाने मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो अशा वि.वा.शिरवाडकर यांना प्रणाम केला. त्यानंतर रितेशने मनोगत व्यक्त केलं.

रितेशचं वर्कफ्रंट

रितेशने केलेल्या या छोट्याश्या कृतीने त्याने सर्वांचं मन जिंकलंय. अनेकांनी रितेशचं कौतुक केलंय. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये आलेल्या 'काकूदा' सिनेमा रितेशने अभिनय केला होता. रितेश सध्या 'हाऊसफुल ५' आणि 'रेड २' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमासाठी अभिनय करतोय. विशेष म्हणजे 'रेड २' सिनेमात रितेश खलनायकाच्या भूमिकेत अजय देवगणला टक्कर देताना दिसणार आहे.

Web Title: riteish deshmukh pray for chhatrapati shivaji maharaj video viral praised by netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.