VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:27 IST2022-08-19T15:27:29+5:302022-08-19T15:27:58+5:30
Riteish Deshmukh, Kareena Kapoor : आता ही काय नवी भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ बघावा लागेल.

VIDEO : हे काय? रितेश देशमुखने करिना कपूरला पाठवली नोटीस; म्हणाला, कोर्टात भेटू
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचं (Riteish Deshmukh) इंडस्ट्रीतले सगळ्यांशी मधूर संबंध आहेत. अगदी बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीला रितेश दिसतोच दिसतो. करण जोहर, करिना कपूर ( Kareena Kapoor) कंपूतही त्याची ऊठबैस चालते. पण आता रितेशने चक्क करिनाला कोर्टाची नोटीस पाठवली आहे. धक्का बसला ना? हे खरं आहे. फक्त नोटीसच नाही तर आता थेट कोर्टात भेटू असा दमही त्याने बेबोला भरलाय. आता ही काय नवी भानगड आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ बघावा लागेल.
या व्हिडीओमध्ये करीनाच्या समोरून एक व्यक्ती जाते. पण तो करिनाकडे ढुंकूनही पाहत नाही. मग काय बेबो खवळते. कोण आहे तो ज्याने माझ्याकडे वळूनही पाहिलं नाही? असा सवाल तर रितेशला करते. यावर, तो कायदा आहे, असं उत्तर रितेश देतो. त्यावर, त्याने मला नोटीस सुद्ध केलं नाही, असं म्हणते. मग काय? रितेश थेट तिच्या हाती कोर्टाचं नोटीस ठेवत कोर्टात भेटू.. असं म्हणतो. ती नोटीस पाहून करीनाला जोरदार धक्का बसतो. रितेशने करीनाला कसली नोटीस दिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर घाबरू नका. ही नोटीस खरीखुरी नोटीस नसून तर ‘केस तो बनता है’ (Case Toh Banta Hai) या रितेशच्या शोचा हा प्रोमो आहे.
करिना कपूर लवकरच या शोमध्ये हजेरी लावणार आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींना कोर्टरुममध्ये उभे करुन त्यांच्यावरील आरोपांना उत्तरे द्यावी लागतात. त्यासाठीच रितेशने हा मजेशीर प्रोमो तयार करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘केस तो बनता है’ हा शो अॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित होतो.