रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 03:16 PM2024-02-22T15:16:11+5:302024-02-22T15:19:20+5:30

रितेश व जिनिलियाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते.

Riteish Deshmukh Share Funny Viral Video with wife Genelia Deshmukh On Instagram Fans Comments See Details | रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का?

रितेश देशमुखच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा, तुम्ही पाहिलात का?

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्री 'क्यूट कपल' म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. रितेश व जिनिलीयाकडे पाहिलं की, त्यांचा अगदी हेवा वाटतो.   लग्नाला इतकी वर्षे उलटून गेली तर त्या दोघांच्या नात्यामधील गोडवा काही कमी झालेला नाही. सोशल मीडियाद्वारे तर दोघंही त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम खुलेपणाने व्यक्त करताना दिसतात. इतकंच नव्हे तर रितेश व जिनिलियाच्या रिल व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसते. सध्या असचं एक त्यांचं रिल चर्चेत आलं आहे. 

नुकतेच रितेशने एक गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रितेश व जिनिलीया अगदी गोड दिसत आहेत. त्यांचा हा रिल नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. हा एक नवरा-बायकोचा मजेशीर रिल आहे.  या व्हिडीओमध्ये बायको पतीला ज्या नावाने हाक मारते त्याचा मजेशीर अर्थ ऐकायला येत आहे.  'AG, OG लोजी सुनो जी' असं कॅप्शन रितेशनं या व्हिडीओला दिलं आहे.  तसेच नेटकऱ्यांनी त्याच्या या व्हिडीओवर अनेक गंमतीशीर कमेंट केल्या आहेत. 

रितेश आणि जिनिलीया विविध व्हिडीओद्वारे चाहत्यांचं अधिकाधिक मनोरंजन करतात.  या दोघांचे हे व्हिडीओ बरेच व्हायरल होतात.  ही जोडी कधीच प्रेक्षकांना निराश करत नाही. रितेश-जिनिलीयाने २०१२ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. 'तेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली होती. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन मुले आहेत. 
 

Web Title: Riteish Deshmukh Share Funny Viral Video with wife Genelia Deshmukh On Instagram Fans Comments See Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.