गांधीजींबद्दल रितेश देखमुखच्या मुलांनी म्हटले असे काही... व्हायरल झाला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:26 AM2020-01-31T10:26:46+5:302020-01-31T10:27:04+5:30
अभिनेता रितेश देशमुख याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
अभिनेता रितेश देशमुख याने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. होय, काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने हा व्हिडिओ शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. या व्हिडिओत रितेशची दोन्ही मुलं म्हणजेच रियान व राहिल दिसत आहे. तर रितेशचा आवाज ऐकू येतोय. हे तिघेही बापलेक व्हिडिओत गांधींबद्दल बोलत आहेत.
गांधींजी खूप खूप महान होते. आपल्या सर्वांपेक्षा मोठे होते, असे रितेश मुलांना सांगतोय. एवढेच नव्हते तर रितेशने त्याचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेही गांधीजींच्या तुलनेत अतिशय लहान असल्याचे म्हटले आहे.
Riaan & Rahyl discussing #MahatmaGandhi ji with me. Gandhiji’s core values will be relevant across generations. @geneliadpic.twitter.com/kUkIsNZNaE
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 30, 2020
‘रियान आणि राहिल महात्मा गांधींजीबद्दल माझ्यासोबत बोलत आहेत. गांधीजींनी जगाला दिलेली मूल्य आणि सिद्धांत अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील, ’असे हा व्हिडीओ शेअर करताना रितेशनने कॅप्शनमध्ये लिहिलेय.
व्हिडीओच्या सुरवातीला रितेशचा पाच वर्षांचा चिमुकला रियान गांधीजींच्या चष्म्याबद्दल बोलतो. ‘गांधीजी खूप जवळून टीव्ही बघायचे. म्हणून त्यांना चष्मा लागला होता,’ असे रियान म्हणतो. यावर तू कसा टीव्ही पाहतोस, असे रितेश त्याला विचारतो. यावर मी पण खूप जवळून टीव्ही बघतो, असे रियान निरागसपणे सांगतो.
तू गांधीजींना भेटशील तेव्हा त्यांना काय म्हणशील? असा प्रश्न रियानला करतो. यावर रियान पुन्हा निरागसपणे उत्तर देतो. गांधीजी आकाशात राहतात. त्यामुळे मी त्यांना नाही भेटू शकत, असे तो म्हणतो. यावर तुम्ही दोघेही गांधीजींना भेटू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की गांधीजी खूप खूप महान व्यक्ती होते, असे रितेश त्यांना सांगतो. यावर, नाही हे मला माहित नव्हते, असे रियान म्हणतो.
गांधीजी आपल्यासर्वांपेक्षा मोठे होते? असा प्रश्न रियान करतो. यावर हो, ते आपल्या सर्वांपेक्षा खूप मोठे होते. तुझ्या आजोबांपेक्षाही खूप मोठे होते, असे रितेश म्हणतो. यानंतर रितेशचा लहान मुलगा राहिलही प्रश्न करतो. काय गांधीजी आजोबांपेक्षाही मोठे होते? यावर रितेश म्हणतो, हो, ते त्यांच्यापेक्षाही खूप खूप मोठे होते. बाबा त्यांच्या तुलनेत खूप खूप लहान होते.... या व्हिडीओतील रियान आणि राहिल यांचा निरागसपणा थेट काळजाला भिडतो.
रितेशने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. हे संस्कार आहेत, याला संस्कार म्हणतात, असे एका चाहत्याने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले आहे.