रितेश देशमुख असणार घमंडी असा समज झाला होता जेनेलिया डिसूजा देशमुखचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:17 AM2018-08-06T11:17:12+5:302018-08-06T12:43:45+5:30
जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटामध्ये रितेश देशमुख तिचा नायक होता. रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांना तेव्हाच आवडली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी रितेश देशमुख हा घमंडी असणार असा जेनेलियाचा समज झाला होता.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा देशमुख यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. जेनेलियाचा काल वाढदिवस होता. जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिच्या पहिल्याच चित्रपटामध्ये रितेश देशमुख तिचा नायक होता. रितेश आणि जेनेलियाची जोडी प्रेक्षकांना तेव्हाच आवडली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आधी रितेश देशमुख हा घमंडी असणार असा जेनेलियाचा समज झाला होता.
जेनेलिया आणि रितेशची भेट झाली ती केवळ १६ वर्षांची होती. २००२ मधील ही घटना आहे. हैद्राबाद विमानतळावर जेनेलिया आणि रितेशची सगळ्यात पहिली भेट झाली होती. तुझे मेरी कसम या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबाद मध्ये होणार होते. त्यामुळे रितेशला सांगण्यात आले होते की, तुझी नायिका तुला हैद्राबाद विमानतळावर भेटणार आहे. त्यानुसार रितेश तिला भेटण्यासाठी विमानतळावर पोहोचला. तर जेनेलियाला रितेश एका मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याची कल्पना असल्याने, तो काहीसा अॅटीट्यूड दाखविणारा असेल, घमंडी असेल अशी तिची धारणा होती. त्यामुळे जेनेलियानेही रितेशच्या समोर अॅटीट्यूड दाखविण्यास सुरुवात केली. ही बाब बघून रितेश दंग झाला. रितेशने याचा फारसा विचार न करता तिच्याशी शेक हँड केला. परंतु त्यावेळी देखील जेनेलिया त्याच्याकडे न बघता दुसरीकडेच बघत होती. जेनेलियाच्या या स्वभावामुळे रितेश बुचकळ्यात पडला.
कालांतराने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात जवळीकता वाढत गेली. दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. मात्र जेनेलियाने जो विचार केला होता, त्याच्या अगदी विपरीत रितेशचा स्वभाव असल्याने ती दंग राहिली, शिवाय ती इम्प्रेसही झाली. रितेश केवळ जेनेलियासोबतच चांगला वागत होता असे नाही, तर शूटिंगदरम्यान तो तिच्या आई-वडिलांबरोबरही अतिशय चांगल्या प्रकारे बोलत असे. त्यामुळे दोघांची मैत्री घट्ट झाली. हैद्राबाद येथील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रितेश मुंबईत आला. मात्र मुंबईत त्याचे फारसे मन लागले नाही. तो जेनेलियाला सारखे मिस करीत असायचा. जेनेलियालादेखील रितेशपासून दूर जाणे शक्य नव्हते. तीदेखील त्याला सातत्याने मिस करायची. खरे तर एकमेकांना बघताच क्षणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु अशाही स्थितीत दोघांपैकी कोणीही एकमेकांना प्रपोज केले नव्हते. त्यानंतर धाडस करून त्यांनी एकमेकांना प्रपोज केले. पुढे तब्बल नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले.