माझे सर्वकाही तूच...! रितेश देशमुखने जेनेलियाला हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:57 PM2020-08-05T12:57:52+5:302020-08-05T13:00:25+5:30
जेनेलिया डिसूजा हिचा आज वाढदिवस...जरा हटके है यह लव स्टोरी...
‘तुझे मेरी मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिचा आज 33वा वाढदिवस. मग शुभेच्छा तर बनतातच. रितेश देशमुखने पत्नी जेनेलियाला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
You are my bestest friend, my eternal laughter, my partner in crime, my happiness, my guide, my enthusiasm, my excitement, my light, my life, my everything. Wishing you a very Happy Birthday Baiko - growing young with you is a blessing. @geneliad#HappyBirthdayGeneliapic.twitter.com/nb2C71LBI7
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 5, 2020
जेनेलियाला मिठी मारतानाचा एक क्युट फोटो रितेशने शेअर केला आहे. सोबत एक हृदयस्पर्शी पोस्ट. ‘तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझे हास्य, माझी क्राईम पार्टनर आहेस. माझी मार्गदर्शक, माझा उत्साह, माझा प्रकाश, माझे जीवन, माझे सर्वकाही तूच आहेस. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. तुझ्यासोबत मोठे होणे हे एक आशीवार्दासारखे आहे,’ असे रितेशने लिहिले आहे.
रितेश व जेनेलिया हे बॉलिवूडचे बेस्ट कपल मानले जाते. 2 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन होती तर रितेश हिंदू. रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा.
अशी आहे लव्हस्टोरी...
2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. हैदराबाद विमानतळावर दोघेही पहिल्यांदा भेटले. आश्चर्य वाटेल, पण या पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशला जराही भाव दिला नव्हता. कारण त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने रितेश गर्विष्ठ असेल, असा जेनेलियाचा समज होता. त्यामुळे त्याने अॅटिट्यूड दाखवण्यापूर्वी जेनेलियानेच त्याला अॅटिट्यूड दाखवायला सुरुवात केली होती.
हैदराबाद विमानतळावर रितेशने जेनेलियाला हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. जेनेलियाने हस्तांदोलन तर केले. पण न करावे अशा थाटात. पहिल्याच भेटीतील जेनेलियाच्या हे वागणे रितेशला खटकले. पण तो शांत राहिला. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.
‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना दोन मुलं आहेत.