रितेश देशमुखचा 'ककुदा'मध्ये आतापर्यंतचा वेगळा अंदाज, दिसणार घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:44 PM2024-07-12T12:44:45+5:302024-07-12T12:45:23+5:30

Kakuda Movie : अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता साकिब सलीम अभिनीत हॉरर कॉमेडी 'ककुदा' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे.

Riteish Deshmukh's unique prediction so far in 'Kakuda', will be seen in the role of ghost hunter Victor Jacobs | रितेश देशमुखचा 'ककुदा'मध्ये आतापर्यंतचा वेगळा अंदाज, दिसणार घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सच्या भूमिकेत

रितेश देशमुखचा 'ककुदा'मध्ये आतापर्यंतचा वेगळा अंदाज, दिसणार घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सच्या भूमिकेत

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता साकिब सलीम (Sakib Salim) अभिनीत हॉरर कॉमेडी 'ककुदा' (Kakuda Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार(Aditya Sarpotdar)ने केले आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील रतोडी गावावर आधारीत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. त्याने घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सची भूमिका साकारली आहे. 

आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारत रसिकांना 'वेड' लावणारा रितेश देशमुख आजवर कधीही न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. १०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवणाऱ्या 'मुंजा'चा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा 'ककुदा' हा आणखी एक हॉरर-कॅामेडीपट डिजिटली रिलीज झाला आहे. २०१८मध्ये 'माऊली' चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र आलेल्या आदित्य आणि रितेश यांचं 'ककुदा'मुळे रियुनियन झालं आहे. यात रितेशने घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सची भूमिका साकारली आहे. हा स्वत:ला तांत्रिक नव्हे, तर घोस्ट हंटर म्हणतो. 'डोन्ट फिअर व्हेन व्हिक्टर इज हिअर', असं म्हणत त्याने १२७ चेटकिणी, ७२ पिशाच्च आणि ४७ भूतांना पळवून लावलेलं आहे. आत्म्यांशी संवाद साधणारा हा तांत्रिक आजच्या काळातील असल्याने त्याचा लुक मॅाडर्न असून, त्याच्याकडे आधुनिक यंत्रंही आहेत. भूतांना जे सांगायचं ते व्हिक्टर कागदावर उतरवून त्यांना मुक्ती देतो. 


या चित्रपटाबद्दल एका मुलाखतीत रितेश म्हणाला होता की, हॉरर कॉमेडी जॉनर नेहमीच मला आकर्षित करते. ककुदाची स्क्रीप्ट मी ऐकली तेव्हा त्याकडे आणखी आकर्षित झालो. याशिवाय एक मजेशीर, विचित्र सेटिंगमधील भूत शिकारीची भूमिका साकारायला मला मजा आली.  ककुदा माझा पहिला हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडी सोबत हॉरर असल्यावर आव्हानं वाढतात. दोन्ही शैलीसाठी अचूक टायमिंग साधणं गरजेचं असते. हा अप्रतिम अनुभव होता.  

Web Title: Riteish Deshmukh's unique prediction so far in 'Kakuda', will be seen in the role of ghost hunter Victor Jacobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.