रितेशने मारला माशांच्या कालवणावर ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2016 12:59 PM2016-09-14T12:59:42+5:302016-09-14T18:29:42+5:30
रितेश देशमुखने ‘बँजो’चे शूटिंग सर्वाधिक एन्जॉय केले. चित्रपटाचा विषय आणि यातील त्याच्या वाट्याला आलेली भूमिका केवळ हेच, यामागचे कारण ...
र तेश देशमुखने ‘बँजो’चे शूटिंग सर्वाधिक एन्जॉय केले. चित्रपटाचा विषय आणि यातील त्याच्या वाट्याला आलेली भूमिका केवळ हेच, यामागचे कारण नाही तर शूटींगवेळी रितेशला लज्जतदार कोळी खाद्यपदार्थांवर ताव मारता आला, हेही यामागचे एक कारण आहे. ‘बँजो’चा महत्वाचा भाग वरळी कोळीवाड्यात चित्रीत झालाय. चित्रीकरणावेळी स्थानिक लोक रितेश देशमुख आणि सिनेमाच्या क्रुसाठी घरी बनवलेले कोळी पध्दतीचे जेवण घेऊन यायचे.
सूत्रांनुसार, गावातली माणसं रितेशवर खूप प्रेम करायची. ते त्याला प्रेमाने ‘माऊली’ हाक मारायची. याप्रेमाखातर, लोकं माशाचे कालवण, शिंपल्यांचं कालवण, और वेगवेगळ्या मास्यांचे प्रकार बनवून आणायचे. रितेश म्हणतो, ‘स्थानिक लोकांनी प्रेमाने आमचा खूप पाहूणचार केला. तोंडाला पाणी सुटणारे कोळी पध्दतीचे जेवण रोज आम्हांला जेवायला मिळायचे. आमचा अख्खा फिल्मचा क्रु जेवणावर अक्षरश: ताव मारायचा. ते पाहून वाटायचं, जसं काही एक मोठं महाराष्ट्रीयन कुटूंब एकत्र येऊन जेवतंय.’ रवी जाधव दिग्दर्शित ‘बँजो’मध्ये रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरीच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.